लासलगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याच्या दारात रोजच घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याचा खर्च वसूल होत नसल्याने आज लासलगाव बाजार समितीमध्ये राज्य कांदा उत्पादक संघटनेने सकाळी लिलाव सुरू झाल्या नंतर लिलाव बंद पाडत आंदोलन सुरू केले. लिलाव सुरू होताच कांद्याला कमीत कमी २०० जास्तीतजास्त ८०० तर सरासरी ४०० ते ४५० रुपयांचा दर मिळाला,कांद्याला १५०० रुपये अनुदान मिळावे आणि सध्या सुरू असलेल्या लिलावात कांद्याला १५ ते २० रुपयाने खरेदी करावा अशी मागणी करण्यात येऊन आजच्या अर्थसंकल्पात सरकारने घोषणा करावी अन्यथा लिलाव सुरू होऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया संघटनेचे नेते भरत दिघोळे यांनी दिली आहे.