मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि सुश्मिता सेन एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दस्तुरखुद्द ललित मोदी यांनी सोशल मिडियाद्वारे दिली. तेंव्हापासूनच नेटकऱ्यांसाठी ही एक सेन्सेशनल जोडी झाली आहे. आता पुन्हा हे आठवायचं कारण म्हणजे ललित मोदी यांनी ‘i love you’ लिहीत एक पोस्ट शेअर केली आहे. तर दुसरीकडे सुश्मिताने देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, आपल्या नात्याची कबुली दिल्यानंतर ललित मोदी यांनी सुश्मिताच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट केली आहे.
https://twitter.com/thesushmitasen/status/1555549406094512128?s=20&t=O8oUIPRq-nfNtjSJ35ypeQ
सुश्मिताने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ हा तिने सर्दीनिया येथे घालवलेल्या सुट्टीचा आहे. या व्हिडिओमध्ये ती पाण्यात पोहताना दिसते आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शन देखील दिली आहे. ‘थोडं थांबा, श्वास घ्या आणि मग सूर मारा’, असे ही कॅप्शन सांगते. समर्पण ही फार छान भावना आहे. भूमध्य समुद्रात मी त्याचा अनुभव घेतल्याचे ती सांगते. तिचा हा व्हिडीओ ललित मोदींना देखील पसंत आला आहे.
https://twitter.com/thesushmitasen/status/1555933603002851328?s=20&t=O8oUIPRq-nfNtjSJ35ypeQ
यासोबतच ललित मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्टही केली आहे. त्यात सुश्मिताचा फोटो शेअर करत, मी तुझ्यावर प्रेम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर गस्तादच्या पर्वतरांगांमधील सर्वात सुंदर हॉटेल आणि स्पा चा आनंद घेता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची ही पोस्ट सुश्मिताला देखील आवडली आहे.
Lalit Modi Comment on Sushmita Sen Swim Suit Video
Entertainment