शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लाल सिंग चढ्ढा सिनेमावरुन वातावरण तापले; हिंदू व शिख संघटना आमनेसामने

by Gautam Sancheti
ऑगस्ट 13, 2022 | 5:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Laal Singh Chaddha

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड मधील काही सिनेमे वादग्रस्त ठरतात, अर्थात या वादाला कधी सामाजिक तर कधी धार्मिक अथवा अन्य कारण असते, सध्या देखील एक सिनेमा असाच वादाच्या भोवऱ्यात पडला आहे. अभिनेता आमीर खान याच्या लालसिंह चड्ढा या सिनेमावरुन पंजाबात हिंदू व शिख संघटना आमनेसामने आल्या आहेत. हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याच्या कारणावरुन हिंदू संघटनांनी आमीर खान आणि त्याच्या सिनेमाचा विरोध सुरु केला आहे. तर शिख संघटना आमीर खानच्या बाजूने मैदानात उतरल्याचे दिसते आहे.

शिख संघटनांचे म्हणणे आहे की, लालसिंह चड्ढा सिनेमा एका शिख पात्रावर आधारित आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्याचा अधिकार हिंदू संघटनांना नाही. दोन प्रमुख समुदायांचे लोक एकमेकांसमोर आल्याने, यामुळे जालंधरमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. आमीर खान याचा सिनेमा लालसिंह चड्ढा गुरुवारी रीलिज झाला. जालंधरमध्ये हा सिनेमा एमबीडी मॉलमधील पीव्हीआर सिनेमात लावण्यात आहे.

सकाळी सिनेमा सुरु होताच शिवसेना आणि इतर हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मॉलबाहेर जमा झाले. यात शिवसेना हिंद, समाजवादी, शिवसेना बाळ ठाकरे, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. ही सगळी स्थिती पाहता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अनेक तास झालेल्या गोंधळानंतर आणि विरोधानंतर अखेरीस लालसिंह चड्ढाचा खेळ बंद करण्यात आला.

खेळ बंद झाल्यानंतर हिंदू संघटनांचे नेते मॉलमधून गेल्यानंतर शिख समन्वय समितीचे पदाधिकारी मॉलमध्ये दाखल झाले. पोलिसांनी थांबवल्यानंतरही, त्यांना न जुमानता हे सगळे पीव्हीआरमध्ये दाखल झाले. त्यांनी हे खेळ थांबवण्याची गरज नसल्याचे पीव्हीआरच्या व्यवस्थापनाला बजावले. हा सिनेमा कोण थांबवतो, हे पाहू असे आव्हानही या शिख संघटनांनी दिले.

शिख समन्वय समितीने शिवसेनेवर वातावरण कलुषित करत असल्याचा आरोप केला आहे. आमीर खानच्या प्रचारासाठी किंवा त्याने कलेल्या चांगल्या कामांची यादी वाचण्यासाठी शिख संघटना इथे आलेल्या नाहीत, हे शिख संघटनांनी स्पष्ट केले आहे. मात्र सिनेमात आमीर खान एका शिखाची भूमिका करीत आहे. जर त्याचा कुणी विरोध करत असेल तर त्याविरोधात संघर्ष करण्याची तयारी असल्याचे शिख संघटनांनी स्पष्ट केले आहे. शिख संघटनांनी हा सिनेमा पाहिल्यानंतरच या सिनेमाला मंजूरी देण्यात आली, असा दावाही संघटनांनी केला आहे.

या सिनेमाला शिख संघटनांचा विरोध नाही तर विरोध करणारी शिवसेना कोण, असा सवालही या संघटनांनी उपस्थित केला आहे. जर हिंदू संघटनांचा आमीर खान याला विरोध असेल तर २०१६ सालीच पीके सिनेमाचा विरोध हिंदूत्ववादी संघटनांनी करायला हवा होता, अशी भूमिकाही शिख संघटनांनी घेतली आहे. आमीर खान याचे सिनेमे हे काहीतरी संदेश देणारे असतात. त्यांच्यातून अव्यवस्थेवर भाष्य केलेले असते. आमीर जी भूमिका करतो, त्यात तो पूर्णपणे समरसून ती भूमिका निभावतो.

लालसिंह चड्ढामध्येही त्याने नकली दाढी न लावता खरी दाढी वाढवली आणि पूर्णपणे शिखांचा बाणा अनुसरून त्याने ही भूमिका केली, असे शिख संघटनांचे म्हणणे आहे. जालंधरच काय तर पूर्ण पंजाबात कुठेही हा सिनेमा थांबवून दाखवा, असे आव्हान शिख समन्वय समितीने शिवसेनेला दिलेले आहे. ही मंडळी कुठेही विरोधासाठी येऊन उभी राहतात, यांची गुंडगिरी खपवून घेणार नसल्याचेही शिख संघटनांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे शिवसेनेने या मुद्द्यावर स्पषीटकरण दिले आहे. विरोध सिनेमाला नसून आमीर खान याला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सन २०१६ मध्ये केलेल्या पीके सिनेमात आमीरने हिंदू देवदेवतांचा अपमान केला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी आमीर खान याचा विरोध करायचा असे हिंदू संघटनांनी ठरवले होते, असेही शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे, त्यामुळे हा वाद निर्माण झाला.

Lal singh Chaddha Movie Hindu and Sikh Organizations Fight

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने क्रिकेट करिअरसाठी घेतला हा मोठा निर्णय

Next Post

खडाखडी सुरू! नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले हे गंभीर आरोप

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Next Post
nana patole

खडाखडी सुरू! नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले हे गंभीर आरोप

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011