India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कोपरगावच्या जिल्हा न्यायाधीशांची कन्या तेजस्विनी बनली दिवाणी न्यायाधीश

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

कोपरगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांनी घेतलेल्या न्यायिक सेवा परिक्षेच्या निकालात ॲड.कु.तेजस्विनी सयाजीराव कोऱ्हाळे यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे. कोपरगाव न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश – १ सयाजीराव कोऱ्हाळे यांच्या त्या कन्या आहेत. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पदाच्या परिक्षेतील ६३ उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात कु.तेजस्विनी सयाजीराव कोऱ्हाळे यांची निवड झाली आहे.

त्यांचे शालेय प्राथमिक शिक्षण न्यायडोंगरी, श्रीरामपूर, जळगाव येथे झाले असून इचलकरंजी येथील इचलकरंजी हायस्कूल (राजवाडा) येथील मराठी शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. तर औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे आणि माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय येथे विधी शिक्षण पूर्ण झाले आहे. पुणे येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कॉर्पोरेट लॉ मध्ये पदव्युत्तर (एल.एल.एम.) कायदा पदवी संपादन केली आहे.

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसायास सुरुवात केली. त्यांचे वडिल व पुणे येथील विधिज्ञ गणेश शिरसाट यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.त्यांचे बंधू हे सुद्धा विधी पदव्युत्तर असून नासिक येथे जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसायात आहेत. त्यांच्या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Kopargaon Advocate Tejaswini Korhale Judge


Previous Post

खंडणीस १४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या फरार आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

Next Post

पुण्याची दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध अशक्यच; शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दावा अशा सुरू आहेत हालचाली

Next Post
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक

पुण्याची दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध अशक्यच; शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दावा अशा सुरू आहेत हालचाली

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group