गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची हजेरी…

by India Darpan
मार्च 26, 2025 | 6:55 am
in संमिश्र वार्ता
0
soni


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
कीर्तनाची परंपरा फार जुनी आहे. या परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जपली. स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या संत शक्तीचा, कीर्तन शक्तीचा, प्रबोधनाचा प्रचंड मोठा वाटा आहे. म्हणूनच ही परंपरा अमूल्य ठेवा आहे, की जो पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करणे गरजेच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

रवींद्र नाट्यमंदिर येथे सोनी मराठी आणि पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्स, चितळे बंधू यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी प्रा.सदानंद मोरे, ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या कार्यक्रमाचे परीक्षक ह.भ.प. राधाताई सानप, ह.भ.प. जगन्नाथ पाटील महाराज, सोनी एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या संकल्पनेवर कार्यक्रम तयार केला याबद्दल सोनी मराठीचं मनापासून अभिनंदन. माध्यमं बदलत आहेत. आणि ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो, त्याच्यामध्ये सोनीसारखे प्लॅटफॉर्मची खूप महत्त्वाची भूमिका आहे.

कीर्तन ही अतिशय जुनी परंपरा आहे आणि कीर्तनकारांनी कीर्तनातून, निरूपणातून, अभंगातून, गायनातून, जे विचार समाजामध्ये पोहोचवले, जे समाज प्रबोधन केलं, ते खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. कीर्तनातून लोकप्रबोधन केलं जाते. सामान्य माणसाला भक्ती परंपरेशी जोडून, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निराश होणार नाही, त्याच्यामध्ये जगण्याची आणि लढण्याची वृत्ती राहील अशा प्रकारचा प्रयत्न कीर्तनामधून केला जातो. या परंपरेचं सगळ्यात मोठं महात्म्य म्हणजे कीर्तनकारांकडे जगाचं ज्ञान आहे, वैश्विक विचार आहे, पण तो वैश्विक विचार सांगत असताना तो साध्या भाषेमध्ये सांगितला जातो की सामान्यातल्या सामान्य माणसाला तो वैश्विक विचार समजतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी संत नामदेव महाराजांचे १६वे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, सावता महाराजांचे १७वे वंशज ह.भ.प. रवीकांत महाराज वसईकर, शेख महंमद महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प. जब्बार महाराज शेख, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, संताजी महाराज जगनाडे यांचे १४वे वंशज ह.भ.प. जनार्दन महाराज जगनाडे, संत बहिणाबाईंचे १३वे वंशज ह.भ.प. प्रमोद पाठक, संत नरहरी महाराज यांचे २१वे वंशज शंकर महामुनी, संत एकनाथ महाराजांचे १४वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमात विजयी ठरणाऱ्या कीर्तनकारास देण्यात येणाऱ्या चांदीची सुंदर, सुबक वीणाचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. सदानंद मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कारचालक जावयास मारहाण, सासूचा विनयभंग…मुजोर दुचाकीस्वारा विरुध्द गुन्हा दाखल

Next Post

डेटा सेंटर, स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल…

Next Post
WhatsApp Image 2025 03 25 at 6.30.46 PM 1024x683 1

डेटा सेंटर, स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011