कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शाळेत परीक्षेचा पेपर सुरू असताना त्यावर ‘जय श्रीराम’ लिहील्यामुळे एक विद्यार्थी अडचणीत आला. मात्र आता त्याला हटकणारे शिक्षक अडचणीत आले असून पोलिसांसह शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते शाळेत दाखल झाले आहेत.
कोल्हापूर येथील एका शाळेत इंग्रजी विषयाचा पेपर होता. एका विद्यार्थ्याने पेपरवर ‘जय श्री राम’ असे लिहिले. हे शिक्षकाने पाहिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यास श्रद्धा मनात ठेवा पेपर वर लिहू नका असे म्हणत हटकले. यामुळे विद्यार्थी हिरमुसला. खरे तर इंग्रजीच्या पेपरवर त्याने ही अक्षरे का लिहीली हाच मुळात प्रश्न आहे. पेपर सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी वरच्या बाजुला जय श्रीराम लिहीले असे काहींचे म्हणणे आहे, तर काहींनी त्याने मुद्दाम हा प्रकार कुणाच्या तरी सांगण्यावरून केला, असेही म्हटले आहे. दरम्यान, हा प्रकार शाळेच्या बाहेर वाऱ्यासारखा कळला. त्यामुळे हिंदुत्तवादी कार्यकर्त्यांनी दंड थोपटले आणि थेट शाळेत धडक दिली. शाळेत गोंधळ उडाला. शिक्षकाने म्हटलेले वाक्य एक विद्यार्थी इतका मनाला लावून घेईल, याचा विचारही कुणी केला नव्हता. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अशात पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेतली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीस दाखल
विद्यार्थ्याला हटकल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांपर्यंत पाेहचली. कार्यकर्ते संबंधित शाळेच्या आवारात एकवटले. त्यामुळे काही जणांनी पाेलिसांना याची माहिती दिली. तातडीने पोलिस देखील शाळेत दाखल झाले. सध्या शाळा व्यवस्थापन, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पाेलिस यांच्यात चर्चा झाली.
kolhapur school student answer sheet jai shriram
Hindu Organisations Guardians Teacher Police