कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाचे एकूण २९ उमेदवार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे सत्तापरिवर्तनासाठी सतेज पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे चित्र आहे.
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष सर्जेराव माने, बाजीराव पाटील, उत्तम चव्हाण यांच्यासह विरोधी गटातील २९ उमेदवारांवर सत्ताधारी गटांकडून तर तानाजी कृष्णा पाटील या सत्ताधारी गटातील उमेदवारावर विरोधी गटाकडून हरकत घेण्यात आली होती. मंगळावरी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता.
आज अंतिम पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये पोटनिमातील तरतुदीनुसार एकूण २९ उमेदवार अपात्र ठरले आहेत. राजाराम कारखान्यावर गेल्या २८ वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. त्यामुळे कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी सतेज पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये थोड्या फरकाने सतेज पाटील पॅनेलचा पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या गटाचे २९ उमेदवार अपात्र ठरणे, मोठा झटका मानला जात आहे.
शाब्दीक चकमक, हकरतदारांवर दबाव
राजाराम कारखान्याच्या अर्ज छाननीवेळी सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे सुद्धा प्रकार घडले. बनावट अर्ज करुन विरोधी उमेदवारांवर हरकत घेतली असा आरोप आमदार सतेज पाटील गटाकडून, तर विरोधकांकडून हकरतदारांवर दबाव टाकला जात असल्याची भूमिका महाडिक गटाने घेतली होती.
Kolhapur Rajaram Sugar Factory Election 29 Candidate Disqualified