मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या ५ जागांसाठीच्या निवडणुकीत आज मतमोजणी होत आहे. यातील पहिला निकाल जाहीर झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. शेकाप उमेदवाराला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे ५ जागांच्या निवडणुकीत १ जागा जिंकून भाजपने आघाडी घेतली आहे.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्याच फेरीत तब्बल २० हजार मते मिळवली. तर, बाळाराम पाटील यांना ९ हजार मते मिळाली. विजयी मतांचा एकूण १६ हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने म्हात्रे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. एकूण २८ टेबलवर मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत ९१ टक्के मतदान झाले होते. कोकणाील ५ जिल्ह्यांमधील मतदारांनी मतदान केले होते. आज सकाळी ८ वाजता नवी मुंबईतील नेरुळ येथे ही मतमोजणी झाली.
https://twitter.com/ChDadaPatil/status/1621053261951426561?s=20&t=FCPJQZIzngGBS1DzbmKm8g
Kokan Teachers Constituency Election Result Declared
BJP Dnyaneshwar Mahtre Win