India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

India Darpan by India Darpan
February 2, 2023
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  लिव्ह इन रिलेशनशिपची आणखी एक वेदनादायक घटना काळबादेवी येथील फणसवाडी परिसरातून समोर आली आहे. जिथे १८ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गीता अजित विरकर (वय ५४ वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. तिचा लिव्ह-इन रिलेशनशिप पार्टनर महेश विश्वनाथ पुजारी (वय ६२ वर्षे) आहे. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने तिच्यावर अॅसिड हल्ला केला.

गेल्या १३ जानेवारी रोजी पुजारीने महिलेवर अॅसिड हल्ला केला होता. अॅसिड हल्ल्यात महिला ५० टक्के भाजली होती. महिलेचा प्रियकर पुजारी याने तिच्याकडे जुगार खेळण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. महिलेने नकार दिल्यावर पुजारीने तिच्यावर सल्फ्युरिक अॅसिडने हल्ला केला. ज्यात ही महिला भाजली होती.

गीता अजित विरकर यांचा मुलगा आदित्य याने घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली होती. त्याने सांगितले की, १० जानेवारी रोजी पुजारीचा माझ्या आईसोबत वाद झाला. त्यामुळे १३ जानेवारी रोजी पुजारीने गीतावर अॅसिडने जीवघेणा हल्ला केला. दोघेही गेल्या २५ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

मुलगा आदित्य याने सर्वप्रथम गीताला भाटिया रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेवर तब्बल १८ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते अखेर तिची प्राणज्योत मालवली आहे.

Mumbai Crime Live In Relationship Acid Attack on Women Death


Previous Post

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

Next Post

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

Next Post

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group