इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्व ठिकाणी अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे केदार शिंदे. दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे हे नाव आदराने घेतले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे विषयातील महत्त्व आपल्या कलाकृतीतून सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याची त्यांची सहजता. त्यांच्या याच गुणामुळे ते कायम चर्चेत असतात. केदार शिंदे यांचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. त्यात त्यांची कन्या सना शिंदे ही झळकणार आहे. शिंदे यांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली. तर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अंकुश चौधरी यांनी शाहीर साबाळेंची भूमिका साकारली आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे लवकरच शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा बराच चर्चेत आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमांत शाहीर साबळे भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना होती. काही दिवसांपूर्वीच ही भूमिका अभिनेता अंकुश चौधरी करणार असल्याचा उलगडा झाला आणि अंकुशचा एक खास लुक देखील रिव्हिल करण्यात आला. तेव्हापासूनच या सिनेमाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली होती. आता मात्र या सिनेमाविषयी एक विशेष घोषणा केदार शिंदे यांनी नुकतीच केली आहे. ती म्हणजे केदार शिंदेंची लेक सना शिंदे या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं….
सौ. भानुमती कृष्णराव साबळे.
आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती 'सना केदार शिंदे'.
पणजीच्या भूमिकेत पणती. 1/3 pic.twitter.com/yBJuO9JyJG— Everest Entertainment (@EverestMarathi) September 3, 2022
केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. हेच शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा आहेत. शाहिरांची पत्नी ‘भानुमती कृष्णकांत साबळे’ यांची ही भूमिका त्यांचीच पणती म्हणजे केदार शिंदे यांची लेक सना साकारणार आहे. आपल्या लेकीचं या सिनेमातील पहिलं पोस्टर रिलीज करत ही माहिती त्यांनी दिली आहे. हे पोस्टर शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत. शाहिरांच्या आयुष्यातील गोड गाणं सौ. भानुमती कृष्णराव साबळे आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती ‘सना केदार शिंदे’.
शाहिरांचा हा झंझावाती जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ सादर करताना केदार शिंदे प्रॉडक्शन सोबत आता आहे मराठी चित्रपट क्षेत्रातील महत्त्वाचं नाव ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट.’ पुढच्या वर्षी २८ एप्रिल रोजी पुन्हा गर्जणार महाराष्ट्राच्या थिएटर्समध्ये अजय अतुलचे सुमधुर संगीत. महाराष्ट्र शाहीर, २८ एप्रिल २०२३ जय महाराष्ट्र!” केदार शिंदेंच्या लेकीला पहिल्यांदाच स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
Kedar Shinde Daughter Coming Soon in This Movie