नाशिक- गुजरात राज्य शाळा पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता दुसरी (प्रथम भाषा) ” कल्लोळ ” या पुस्तकात प्रा.गिरीश सी पाटील यांच्या “आपण सर्व खोडकर ” या कवितेचा समावेश केला आहे . विषय सल्लागार श्रीमती सुदेष्णा मुरलीधर कदम त्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. गिरीश पाटील यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की गुजरात राज्य शाळा पाठ्यपुस्तक मंडळ यांचा मी आभारी आहे . जीवनात आपले काही लेखन बाळ गोपाळ साठी होईल हे स्वप्नात ही वाटले नव्हते . माणसं जन्माला येतात आणि जातात पण त्यांचे लेखन चिरंजीव असते . लहान मुलांसाठी लिहिणे कठीण असते.पण ते जमले याचे समाधान वाटते.
प्रा.गिरीश सी पाटील यांचे म्मरो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ.रोहन सोनी,संचालिका प्रा.सुनंदा सोनी प्रा.श्रीकांत सोनावणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.