इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एका सैनिकाच्या पत्नीचा अमानूष छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सैनिकाच्या पत्नीला अर्धनग्न करून शंभरहून अधिक व्यक्तींनी छळ केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सैनिकाने संबंधित राज्य सरकारशी संपर्क करत मदतीची भिक मागितली आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना तमिळनाडू येथील आहे. येथील तिरुवन्नामलाई येथील एका महिलेला जमावाने मारहाण केली आहे. ही महिला बेशुद्ध होईपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. १०० हून अधिक लोकांच्या जमावाने या महिलेला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच यासंबंधी आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या महिलेच्या पतीने जो भारतीय सैन्यातला जवान (सध्या काश्मीरमध्ये तैनात) आहे त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे जवानाने तमिळनाडू सरकारकडे न्याय मागितला आहे.
या महिलेची परिस्थिती सध्या गंभीर आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेच्या पतीने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याने म्हटलं आहे की, “मी देशाला शत्रूंपासून वाचवण्यासाठी भारतीय सैन्यात दाखल झालोय, मी सध्या काश्मीरमध्ये तैनात आहे. माझ्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर आहे. तिकडे माझ्या पत्नीला १२० गुंडांनी अर्धनग्न करून बेदम मारहाण केली आहे.” या व्हिडिओमध्ये तो हात जोडून गुडघ्यावर बसून न्याय मागताना दिसत आहे.
माजी सैनिक संघटनेकडून निषेध
सैनिकाच्या पत्नीला मारहाण झाल्याच्या घटनेचा माजी सैनिक संघटनेने निषेध नोंदविला आहे. याबाबत तामिळनाडू माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष एन. टी आगराजन म्हणाले,‘मी या घटनेचा निषेध करतो. आपण कोणत्या जगात आहोत? तामिळनाडूमध्ये असलेल्या आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या लष्करातील जवानाची ही दयनीय अवस्था पाहवत नाही. जेव्हा एखादा सैनिक देशाच्या रक्षणासाठी जातो तेव्हा त्या सैनिकाची पत्नी आणि कुटुंबाची काळजी घेणं ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी असते.’
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक करावे
https://twitter.com/NTR_NationFirst/status/1667577908880080899?s=20
Kashmir Soldier Video Viral Wife Molestation