पिंपळगांव बसवंत – इंधन व स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने भाववाढ होत असल्याने केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणांमुळे देशात महागाई वाढत आहे, त्यामुळे गृहिणी वैतागल्या असुन केंद्र सरकारचा निषेध म्हणुन निफाड तालुका महिला राष्ट्रवादी कॅाग्रेसने आज केंद्र सरकारला कसबे सुकेणे येथुन टपालाने पाकीटात गोव-यांची राख भरुन ती दिल्लीला पाठविली. या अनोख्या आंदोलनाची आज निफाड तालुक्यात दिवसभर चर्चा होती कसबे सुकेणे येथे आज शनिवार ४ रोजी इंधन व स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरच्या दरवाढीचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. प्रदेश सरचिटणीस अश्विनी रामराव मोगल यांच्या नेतृत्वाखाली कसबे सुकेणे गॅस दरवाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कसबे सुकेणे येथील टपाल कार्यालयात जाऊन गोव-यांची राख भरलेली पाकीटे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंञिमंडळाला भेट म्हणुन पाठविली. या आंदोलनाची आज सुकेणे व तालुक्यात चर्चा होती. यावेळी आरती तिडके, शितल वाघ, ज्योती वाघ, लक्ष्मीबाई तिडके, शबाना शेख, स्वाती पिंपळे, अलका पिंपळे, सुशीला गवळी, व इतर महिला उपस्थित होत्या.
निषेध म्हणून राख पाठवली
ग्रामीण भागातील सर्व सामान्य , शेतकरी व शेतमजूर व गृहिणी स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर दरवाढीमुळे महागाई त होरपळत आहे, याचा निषेध म्हणून आम्ही शेणाच्या गोव-या मोदी सरकारला टपालाने पाठवित आहोत.
अश्विनी मोगल, सरचिटणीस, प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस