पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे निकालाची उत्कंठा संपली आहे. मात्र, सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस फेम अभिजित बिचकुले आणि हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांना किती मते मिळाली. मतमोजणी पूर्ण झाल्याने या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आनंद दिवे व अभिजीत बिचकुले यांनी रंग भरला होता. ते प्रत्येकवेळी विजयाचा दावा करत होते. पण, ही निवडणूक काँग्रेस व भाजपमध्येच अटीतटीची झाली. त्यामुळे येथे उतर उमेदवारांचा फारसा मतदारांनी विचार केला नाही. पण, या दोन उमेदवारांना किती मते मिळाली याची उत्सुकता सगळ्यांना होती. त्यात दवे यांना २९६ तर बिचकुले यांना अवघे ४७ मते पडली.
या निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते मिळाली. तर भाजपचे हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मते मिळाली. कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्याजागी ही पोटनिवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना मतदारांची फारशी पसंती नसल्याचे दिसून आले. भाजपने पूर्ण ताकद या निवडणुकीसाठी लावली. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजप पदाधिकारी, राज्यातील मंत्री यांच्या सभा व रोडशो आयोजित केला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचेही दिग्गज नेते प्रचारात होते. पण, या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराबरोबरच दवे व बिचकुले यांच्या उमेदवारींची सुध्दा चर्चा होती. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांनी किती मते पडले हे विचारले जात होते.
Kasba By Poll Election Bichkule and Dave Votes Social Media