नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप खासदार कंगना रनौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेले वक्तव्य हे पक्षाचे मत नाही. कंगना रनौतच्या विधानाशी भाजप सहमत नाही. पक्षाच्या वतीने, कंगना रनौतला पक्षाच्या धोरणाच्या मुद्द्यावर विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकार नाही असे सांगत भाजपने कंगना रनौत यांची कानउघडणी केली आहे.
कंगना रनौतने शेतक-यांच्या आंदोलना दरम्यान अनेक हत्या आणि बलात्कार झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचबरोबर तीने भारतात सनात धर्माला मजबूत करावे लागेल आणि यासाठी आपल्याला सर्व लोकांना जागरुक करावे लागेल असेही म्हटले होते. त्यानंतर भाजपने एक पत्रक काढून ही कानउघडणी केली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, भाजप खासदार कंगना रनौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेले वक्तव्य हे पक्षाचे मत नाही. कंगना रनौतच्या विधानाशी भाजप सहमत नाही. पक्षाच्या वतीने, कंगना रनौतला पक्षाच्या धोरणाच्या मुद्द्यावर विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकार नाही. भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंगना रनौत यांना भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्ष ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ आणि सामाजिक समरसता या तत्त्वांचे पालन करण्याचा निर्धार असल्याचेही म्हटले आहे.