India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

खर्चही निघत नसल्याने कांदा ३००० रुपये दराने नाफेड मार्फत खरेदी करावा, या पक्षाने केली मागणी

India Darpan by India Darpan
September 27, 2022
in स्थानिक बातम्या
0

राहुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आज कांद्याला ८०० ते १००० रूपये प्रती क्विंटल असे सरासरी भाव मिळत असून यामध्ये शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नसल्याने शासनाने त्वरित निर्यात चालू करून नाफेड मार्फत किमान ३००० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करून यावर्षी बाजार समिती मार्फत विक्री झालेल्या कांद्याला प्रती क्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना लॅाकडाऊन, अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. त्यातच शासनाची कुठलीच मदत मिळत नसल्याने चालु वर्षी पूर्ण खरीपातील पिके सततच्या पावसामुळे उपळुन गेली आहेत. काही पिकांचे अल्प प्रमाणात पंचनामे करुन तुटपुंजी मदत देऊन शासन शेतकऱ्यांचे समाधान करण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यातच डिझेल, पेट्रोल, रासायनिक खते, मजुरी, कीटकनाशके यांचे दर खूपच वाढलेले असून एक एक्कर कांदा लागवडीपासून ते भुसार स्टॅाक करेपर्यत किमान नव्वद हजार ते एक लाख पर्यत खर्च येतो. दररोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरत असलेला कांद्याचा जीवनावश्यक वस्तुमध्ये समावेश करुन व निर्यात शुल्क वाढवून बाहेर देशामध्ये मागणी असतानाही सरकार कांद्याची निर्यात करत नसून कायमच कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.

शेतक-यांनी कांदा एप्रिल ते मे महिन्यात काढलेला असून भुसा-यामध्ये ठेवून त्याला आज रोजी पाच ते सहा महिने झाले आहे. त्यात ३० ते ४० टक्के घट झालेली असल्याने आज कांद्याला किमान ३००० रुपये भाव मिळाला तरच शेतकरी, कष्टकरी बळीराजाला दोन पैसे हातात येईल. शासनाने त्वरित योग्य निर्णय न घेतल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. तसेच बाजार समितीत पदाधिकारी व व्यापार्यांच्या संगनमताने भावात गोलमाल केले जाते. त्याकडे शासनाने लक्ष घालावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिश्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा ईशारा तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिला आहे.


Previous Post

अंध सासऱ्यांच्या सेवेत फुलवली निर्यातक्षम द्राक्ष शेती; रत्नबाई अपसुंदे यांची जबरदस्त यशोगाथा

Next Post

आता पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची सुविधा

Next Post

आता पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची सुविधा

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group