नाशिक – बोगस बियाणे, प्रतिकुल हवामान, अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटी सदृश्य पावसाने खरिपाच्या लाल कांद्याचे प्रचंड नुकसान झाले असतांना आणि ६-७ महिन्यांपासून साठवणूक केलेल्या उन्हाळी कांदा निम्यापेक्षाही अधिक सडल्याने आता शिल्लक उन्हाळी कांद्यासह नवीन लाल कांद्याचेही बाजार भाव वाढण्यास सुरुवात होताच केंद्र सरकारने इराण, तुर्की, अफगाणिस्थानसह इतर देशातील कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिल्याने मुंबई आणि महाराष्ट्रातील काही आयातदारांनी कांदा आयात केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या कांद्याला भाव कमी मिळत असून शेतकऱ्यांचा कांदा ५० रुपये प्रति किलोऐवजी सरासरी २२-२५ रूपये बाजार भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मुंबई आणि महाराष्ट्रातील ज्या- ज्या आयातदार अडते व्यापारी यांनी परदेशी कांदा आयात केला आहे त्या-त्या कांदा उत्पादक शेतकरी विरोधी व्यापाऱ्यांची (संपूर्ण महाराष्ट्रातील) यादि , नाव,गाळानंबर, मोबाईल नंबर तसेच फोटो सर्व महाराष्ट्रात फेसबुक ग्रुप व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकरी अशा आयातदार, अडते, आणि व्यापारी यांचा योग्य तो बंदोबस्त करतील आणि भविष्यात त्यांना एकही कांदा उत्पादक शेतकरी कांदा देणार नाही. याची सर्व आयातदार, अडते आणि व्यापारी यांनी नोंद घ्यावी.