नाशिक – आता जागतिक व्यापार संघटनेनेही भारताच्या कांदा निर्यातबंदीच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली असल्याने केंद्र सरकारने आता तरी कांद्याचे राष्ट्रीय धोरण तयार करावे कांदा निर्यातीतून सरकारलाही मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळण्यासाठी संधी असून भारतीय कांदा उत्पादकांना सातत्यपूर्वक जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले.
यावेळी ते म्हणाले की, जगात दुसऱ्या क्रमांकाचे कांदा उत्पादन घेणाऱ्या आपल्या देशामध्ये घेतले जाते. आजपर्यंत कांद्याच्या निर्यातीचे ठोस असे धोरण न ठरल्याने देशातील कांदा उत्पादकांना नेहमीच याचा आर्थिक फटका बसत आलेला आहे. जगात भारताची ओळख बेभरवशाचा कांदा निर्यात करणारा देश अशी निर्माण झालेली असल्याचेही त्यांनी सांगितले.