रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिक्षणाचा खेळखंडोबा! गेल्या ७ वर्षात शिक्षण विभागावर चौथ्या मंत्र्याची नियुक्ती

by India Darpan
जुलै 9, 2021 | 11:40 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्रीय पातळीवर शिक्षण मंत्रालयाला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. नव्या आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांची तसेच खासगी संस्थांची वाढती संख्या आणि नीट, जेईईसारख्या राष्ट्रव्यापी परीक्षा सुरू झाल्यामुळे शिक्षण मंत्रालयाचे महत्त्व वाढले आहे. परंतु राजकीय पातळीवर या मंत्रालयाला जास्त प्राधान्य दिले जात नसल्याने सारखे शिक्षणमंत्री बदलले जात आहेत. परिणामी मंत्रालयाचे गांभीर्य नाहीसे होत आहे.
एनडीएच्या मागील सरकारमध्ये आधी स्मृती इराणी आणि नंतर प्रकाश जावडेकर यांना मंत्री बनविण्यात आले होते. या सरकारमध्ये रमेश पोखरियाल निशंक यांच्याऐवजी आता धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर फक्त चार मंत्र्यांनीच आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
शिक्षण मंत्रालय असो किंवा दुसरे कोणतेही मंत्रालय असो, मंत्र्यांना नेहमीच बदलले तर धोरणांची कठोर अंमलबजावणी करण्यामध्ये किंवा राजकीय कटिबद्धता पूर्ण करण्यामध्ये अनेक अडचणी येतात. त्यामुळे संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पूर्ण पाच वर्षांसाठी काम करण्याची संधी द्यावी, यातच हित आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शिक्षण आणि आरोग्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नेहमीच होतात, त्यामुळे ही बाब आणखी अधोरेखित होते.
पाच वर्ष काम करणारे शिक्षणमंत्री
देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद आणि त्यांच्यानंतर के. एल. श्रीमाली यांनी आपले कार्यकाळ पूर्ण केला. १९६३ पासून १९९९ पर्यंत जितके शिक्षणमंत्री झाले त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. १९९९ एनडीए सरकारमध्ये डॉ. मुरली मनोहर जोशी आणि त्यानंतर २००४ मध्ये यूपीए सरकारमध्ये अर्जुन सिंह शिक्षणमंत्री झाले होते. त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर कपिल सिब्बल, पल्लम राजू, आदी मंत्री झाले परंतु कोणालाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधीच मिळाली नाही.
राजकीय प्रमुख कारण 
राजकीय कारणांमुळे मंत्रिमंडळामध्ये नेहमी होणार्या फेरबदलामुळे शिक्षण मंत्रालयावर विपरित परिणाम झाला आहे. काही केंद्र सरकारचा कार्यकाळ पूर्ण न झाल्यानेही शिक्षण मंत्रालयावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
दिग्गज शिक्षणमंत्री
तीन माजी पंतप्रधान शिक्षणमंत्री झाले होते. त्यामध्ये पी. व्ही. नरसिंह राव, व्ही. पी. सिंह तसेच अटल बिहारी वाजपेयी यांचा समावेश आहे. त्याशिवाय कर्ण सिंह, फखरुद्दीन अली अहमद, के. सी. पंत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवर मंत्रालयाची जबाबदारी होती. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिग्गज नेत्यांना मिळू शकली नाही.
आतापर्यंत ३० मंत्री
देशात आतापर्यंत ३० शिक्षणमंत्री झाले आहेत. त्यामध्ये पी. व्ही. नरसिंहराव, अर्जुन सिंह दोन वेळा मंत्री होते. धर्मेंद्र प्रधान ३१ वे शिक्षणमंत्री झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात शिक्षण मंत्रालय स्थापन करण्यात आले होते. परंतु १९८५ मध्ये राजीव गांधी सरकारच्या काळात त्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालय असे नामकरण करण्यात आले. गेल्या वर्षी ते पुन्हा शिक्षण मंत्रालय याच नावाने ओळखू लागले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रसरकार, मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत असल्याने ट्वीटरवर कारवाई

Next Post

रॅपिड टेस्ट किती परिणामकारक? भारती विद्यापीठाच्या संशोधनाचे हे आहेत निष्कर्ष

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

रॅपिड टेस्ट किती परिणामकारक? भारती विद्यापीठाच्या संशोधनाचे हे आहेत निष्कर्ष

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011