रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कल्याण डोंबिवलीतील रस्ते होणार चकाचक; तब्बल ४४५ कोटींच्या कामांचे भूमीपूजन

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2022 | 1:53 pm
in राज्य
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या विविध रस्त्यांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, राजू पाटील, एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, आदी उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील एमएमआरडीएच्या वतीने ४४५ कोटीच्या २४ विविध रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन यावेळी झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. खड्डेमुक्त रस्ते हे या शासनाचे ध्येय आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते असावे ही जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे रस्ते करण्यावर भर देत आहोत. राज्यात समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, वसई विरार मल्टिमोडल रोड असे अनेक प्रकल्प राज्य शासनाने प्राधान्याने घेतले असून ते वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. मुंबई पुणे महामार्गावर जगातील रुंदीने सर्वात मोठा टनेल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात येत आहे. असे प्रकल्प राज्यासाठी कायापालट करणारे आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोच्या जाळ्यामुळे खासगी वाहने कमी होऊन प्रदूषण कमी होईल. एमएमआरडीए ला प्रकल्पासाठी साठ हजार कोटींच्या निधींसाठी परवानगी दिली आहे.

कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी आणखी मोठ्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. शीळ फाटा रस्त्याला पर्यायाचा विचार करत आहोत. शिळ फाटा ते भिवंडी मल्टिलेव्हल रस्ता करणार आहोत. या शहराला आणखी चांगले करण्यासाठी जेजे करता येईल ते करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले. हे सरकार लोकांचे आहे. लोकांसाठी जे जे करता येईल ते करण्यासाठी मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, सबका साथ सबका विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १८ तास झटत आहेत. सामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आनंदाचा शिधा वाटप केले. पुढील चार सणांना सुद्धा हा शिधा वाटप करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कल्याण डोंबिवली मधील सर्व रस्ते लवकरच सिमेंट चे करण्यात येणार आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम हे शासन करत आहे. विकासाचे रथ घेऊन निघालेल्या या सरकारच्या पाठीशी सर्व जनता असल्याचेही श्री. चव्हाण म्हणाले.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, कल्याण डोंबिवली च्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. या परिसरातील खड्डेमुक्त रस्त्यासाठी ४४५ कोटींची कामांचे भूमिपूजन आज करत आहोत. याशिवाय या भागासाठी शीळ फाटा ते राजनोली रस्ता, शीळ फाटा येथे ग्रेड सेपरेट, दुर्गाडी ते टिटवाळा रिंगरोड मोठगाव पर्यंत आणणे, मेट्रो असे अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवली, अंबरनाथ व बदलापूर चा चेहरामोहरा बदलणार आहे.

कल्याण शीळ रस्त्याला पर्यायी रस्ता करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज डोंबिवलीमधील डोंबिवली पूर्व गजानन चौक ते ( नांदिवली) नाला पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, शिळ रस्ता ते संदप उसरघर रस्ता काँक्रीटीकरण, डोंबिवली पूर्व मानपाडा रस्ता (स्टार कॉलनी ते समर्थ चौक रस्ता) काँक्रीटीकरण, उंबार्ली पाईपलाईन से उंबार्ली स्मशानभूमीपर्यंत रस्ता तयार करणे यांच्यासह २४ रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले.

Kalyan Dombivali Roads 445 Crore Work

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खळबळजनक; कर्ज वसूलीसाठी गेल्यानंतर तरुणीच्या दुचाकीच्या डिक्कीत आढळला गावठी कट्टा

Next Post

आत्महत्येचे सत्र सुरुच; शहरात वेगवेगळ्या भागात राहणा-या तीन युवकांची आत्महत्या

India Darpan

Next Post
sucide 1

आत्महत्येचे सत्र सुरुच; शहरात वेगवेगळ्या भागात राहणा-या तीन युवकांची आत्महत्या

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011