तालुक्याच्या विकासाचा गेल्या काळातील अनुशेष भरून काढणार; आमदार नितीन पवार
कळवण – कळवण तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विकासाची आणि रस्त्यांची कामे मंजूर असून देखील निधी अभावी कामाला विलंब होत होता. तालुक्यातील अनेक रस्त्यांची आणि विकासाची कामे मंजूर झाली असून विकासकामे दर्जेदार करून तालुक्याच्या विकासाचा गेल्या काळातील अनुशेष भरून काढण्यात येईल अशी माहिती कळवणचे आमदार नितीन पवार यांनी खर्डेदिगर गटातील २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन, लोकार्पण प्रसंगी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार होत्या.
कळवण तालुक्यातील खर्डेदिगर गटातील २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ, लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ऑनलाईन पद्धतीने कळवण येथील कार्यक्रमात केले होते. आमदार नितीन पवार यांनी आज प्रत्यक्षात खर्डेदिगर गटातील विविध गावं, वाडया, वस्तीवर जाऊन विकासकामांचा प्रारंभ करुन ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकार्पण करुन ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या. तालुक्यातील लखानीपाडा,मोहबारी, पाडगण,धार्डेदिगर, सुळे,जयदर, खडकी,कोसवन, सुपले दिगर,खर्डेदिगर, पुनंदनगर,काठरेदिगर, भैताणे,पिंपळे बु, सावरपाडा,मळगाव खुर्द,दह्याणे दिगर, हुंड्यामोख,गणोरे, देसराने,इन्शी, नाळीद,भांडणे येथील सभामंडप, अंगणवाडी, स्मशानभूमी शेड व रस्ता,गावं अंतर्गत रस्ता, नळ पाणी पुरवठा योजना,सामाजिक सभागृह,रस्ता सुधारणा, गावतळे, बैठक व्यवस्था,सिमेंट बंधारा, रस्ता काँक्रिटीकरण,पीक अप शेड,पेव्हर ब्लॉक बसविणे,रस्त्यावरील मोरी बांधकाम, रस्ता डांबरीकरण व सुधारणा करणे आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार नितीन पवार यांनी यावेळी ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेत संवाद साधला. कोरोना महामारीमुळे विकासाचा निधी आरोग्यावर खर्च करावा लागला त्यामुळे कळवण तालुक्यातील अनेक रस्त्यांची व विकासात्मक कामे थांबली होती. चालू आर्थिक वर्षात महाविकास आघाडी सरकारनकडून तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे तालुक्यातील सर्वच रस्त्यांची कामे आगामी काळात टप्या टप्याने पूर्ण होतील तालुक्यातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी अधिकारी वर्गाने लक्ष देऊन व ग्रामस्थांनी सहकार्य करून कामे पूर्ण करून घ्यावीत असे आमदार पवार यांनी सांगितले .
यावेळी तहसीलदार बी ए कापसे,राष्ट्रवादीचे युवा नेते ऋषिकेश पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, पंचायत समिती सदस्य लालाजी जाधव, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब वराडे, चणकापूरचे सरपंच ज्ञानदेव पवार, संतोष देशमुख, हेमंत पाटील, मन्साराम ठाकरे,गंगाराम पाटील,रघुनाथ महाजन,सीताराम जाधव,गटविकासधिकारी निलेश पाटील,डी एम गायकवाड,राष्ट्रवादीचे अभोणा शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे,संतोष गावीत, रामदास चव्हाण,राजू पाटील, अनिल घोडेस्वार, संदीप पगार, सागर खैरनार, उमेश सोनवणे आदींसह ग्रामस्थ, शासकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.