रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कळवण – दीर भावजयीची प्रतिष्ठेच्या निवडणुकीत दीराची सरशी; नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीची सत्ता

by Gautam Sancheti
जानेवारी 19, 2022 | 5:21 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220119 WA0025

 

भाजपाला अवघ्या दोन जागा, मनसेचा प्रवेश
कळवण -. कळवण नगरपंचायतच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने पुन्हा सत्ता काबीज करुन १४ जागांवर विजय मिळवून भाजपाचा धुव्वा उडवला. भाजपाला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले असून मनसेने नगरपंचायतमध्ये प्रवेश केला आहे. कळवणकरांनी नगरपंचायतची सत्ता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कौतिक पगार यांच्या हाती सत्तेची सूत्रे दिली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावून शहरात प्रचार केला होता. पण, या निवडणुकीत आमदार नितीन पवार यांची पुन्हा एकदा सरशी झाली.

गटनेते कौतिक पगार यांची पुन्हा एकदा सत्ता नगरपंचायतीवर आली आहे. १७ जागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ९ जागावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसला ३ शिवसेनेला २ तर भाजपाला २ व मनसेला १ जागा मिळाली आहे.या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविणारे राष्ट्रवादीचे गटनेते कौतिक पगार व बिनविरोध विजयी झालेल्या प्रथम नगराध्यक्षा सौं सुनिता पगार हे पती पत्नी पुन्हा नगरपंचायतमध्ये गेले असून कळवणच्या राजकीय इतिहासात त्याची नोंद झाली आहे.सर्वांत कमी अवघ्या २८ मतांनी विजयी झालेले मनसेचे चेतन मैंद या निवडणुकीत जॉईट क्लीनर ठरले आहे त्यांनी कमकोचे अध्यक्ष सुनील महाजन यांचा पराभव करुन सर्वांचे लक्ष वेधले.
पहिल्या पंचवार्षिकमधील विद्यमान
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कौतिक पगार, प्रथम नगराध्यक्षा सौं सुनिता पगार,बाळासाहेब जाधव माजी नगराध्यक्ष मयूर बहिरम, शिवसेनेच्या सौं रोहिणी महाले हे पुन्हा नगरपंचायतमध्ये विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सौं अनुराधा पगार यांचा प्रभाग १५ तर भाजपाच्या नगरसेविका सौं सुरेखा जगताप यांचा प्रभाग २ व ६ या दोन्ही ठिकाणी मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल पगार, गौरव पगार,मोतीराम पवार सौं हर्षदा पगार, सौं ज्योत्सना जाधव सौं लता निकम,काँग्रेसचे तेजस पगार, सौं रत्ना पगार, शिवसेनेच्या सौं ताराबाई आंबेकर, मनसेचे चेतन मैंद, भाजपाच्या सौं भारती पगार, सौं भाग्यश्री शिरोरे हे नवीन चेहरे या निवडणुकीत विजयी झाले आहे

लोकनेते ए टी पवार सांस्कृतिक भवन मध्ये सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर निवडणूक निकालाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन पटेल यांनी केल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची अतिशबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.मतमोजणी केंद्रापासून आमदार नितीन पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कौतिक पगार, कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, युवा नेते भूषण पगार,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव,शहरप्रमुख साहेबराव पगार यांच्या नेतृत्वाखाली विजयी उमेदवारांनी कळवण शहरातून विजयी मिरवणूक काढून कळवणकरांना अभिवादन करीत आभार मानले. लोकनेते ए टी पवार सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर अवघ्या सव्वा तासात सर्व प्रभागाचे निकाल घोषित करण्यात प्रशासनाला यश आले. पहिल्या फेरीत प्रभाग क्र 1,2,3 व 4 दुसऱ्या फेरीत प्रभाग क्र 5,6,8 व 9 तिसऱ्या फेरीत प्रभाग क्र 10,13 व 14 व चौथ्या फेरीत प्रभाग क्र 15,16 व 17 या प्रभागाची मतमोजणी करण्यात येऊन निवडणूक निकाल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन पटेल यांनी घोषित केला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथम नगराध्यक्षा सौं सुनिता पगार, सौं हर्षदा पगार, काँग्रेसचे तेजस पगार हे बिनविरोध विजयी झाले आहे.

प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपंचायत गटनेते कौतिक पगार यांनी 546 मते मिळवून भाजपाच्या नंदकुमार खैरनार यांचा पराभव केला त्यांना.43 मते मिळाली. प्रभाग 2 मध्ये शिवसेनेच्या ताराबाई आंबेकर यांनी 518 मते मिळवून भाजपाच्या नगरसेविका सुरेखा जगताप यांचा पराभव केला त्यांना 18 मते मिळाली तर काँग्रेसच्या आशा पवार यांना.14 तर , अपक्ष प्रतिभा पवार 269 यांना मते मिळाली. .प्रभाग 3 मध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मयूर बहिरम यांनी 319 मते मिळवून भाजपाचे तेजस ठाकरे यांचा पराभव केला.त्यांना 145 मते मिळाली.. प्रभाग 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव पगार यांनी 532 मते मिळवून भाजपाच्या भास्कर पगार यांना पराभूत केले त्यांना 342 मते मिळाली तर शिवसेनेचे मोतीराम पगार यांना 42मते मिळाली. प्रभाग 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल पगार यांनी 458 मते मिळवून भाजपाच्या भूषण शिरोरे यांचा पराभव केला त्यांना 274 मते मिळाली मनसेचे शशिकांत पाटील यांना 24तर अपक्ष ( पंकज पगार यांना 51 तर अपक्ष कल्पना पगार यांना.1 मत मिळाले. प्रभाग 6 मध्ये शिवसेनेच्या रोहीणी महाले यांनी 305 मते मिळवून भाजपाच्या नगरसेविका सुरेखा जगताप यांचा पराभव केला त्यांना 27. मते मिळाली तर अपक्ष आशा पवार यांना 126 मते मिळाली.

प्रभाग 8 मध्ये मनसेचे चेतन मैंद यांनी 284 मते मिळवून राष्ट्रवादी पुरस्कृत कमको अध्यक्ष सुनील महाजन यांचा पराभव केला त्यांना 256 मते मिळाली तर भाजपाच्या डॉ अनिल महाजन यांना 13 मते मिळाली. प्रभाग 9 मध्ये भाजपाच्या सौं भाग्यश्री शिरोरे यांनी 538 मते मिळवून राष्ट्रवादीच्या रुपाली कोठावदे यांचा पराभव केला त्यांना 222. मते मिळाली. प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योत्सना जाधव यांनी.353. मते मिळवून काँग्रेसच्या रुपाली निकम यांचा पराभव केला त्यांना 141 तर भाजपाच्या विद्या धिवरे यांना 98 मते मिळाली. प्रभाग 13 मध्ये काँग्रेसच्या सौं रत्ना पगार यांनी 525. मते मिळवून भाजपच्या प्रियंका सोनवणे यांचा पराभव केला. त्यांना 141 मते मिळाली. प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब जाधव यांनी 331 मते मिळवून भाजपाच्या शांताराम जाधव यांचा पराभव केला त्यांना 135 मते मिळाली मनसेचे जितेंद्र गरूड यांना 77 तर अपक्ष बाळू आहिरे यांना..18. मते मिळाली. प्रभाग 15 मध्ये भाजपाच्या सौं भारती पगार यांनी 510 मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सौं अनुराधा पगार यांचा पराभव केला त्यांना 259. मते मिळाली. प्रभाग 16 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मोतीराम पवार यांनी 353 मते मिळवून भाजपाच्या गणेश माळी यांना पराभूत केले त्यांना.156मते मिळाली. प्रभाग 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौं लता निकम यांनी 347 मते मिळवून भाजपाच्या सौं सुनिता पगार यांचा पराभव केला. त्यांना 304 मते मिळाली.

मातब्बर पराभूत –
कमको अध्यक्ष सुनील महाजन, मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका सौं अनुराधा पगार, भाजपा नगरसेविका सौं सुरेखा जगताप, भाजपा जिल्हा महामंत्री नंदकुमार खैरनार,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण शिरोरे, भाजपा तालुका सरचिटणीस डॉ अनिल महाजन, मनसेचे जितेंद्र गरुड यांचा पराभव झाला.
मनसेचे मैंद जायंट किलर –
कळवण नगरपंचायतीत सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेतन मैंद यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुनील महाजन यांचा धक्कादायक पराभव केला. महाजन हे ह्याच प्रभागाच्या नगरसेविका अनिता महाजन यांचे पती तर कमको बँकेचे चेअरमन, कृऊबा चे संचालक,कळवण एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त आहेत.तर चेतन मैंद या कुठलाही राजकीय पूर्वानुभव नसलेल्या नवख्या युवा उमेदवाराने महाजन यांचा केलेला पराभव कळवण शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
पती – पत्नी दुसऱ्यांदा विजयी –
राष्ट्रवादीचे गटनेते व माजी उपनगराध्यक्ष कौतिक पगार आणि त्यांच्या पत्नी सुनीता पगार हे दांपत्य दुसऱ्यांदा विजयी झाले.कळवण च्या प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार ह्या मागील वेळेस प्रभाग क्रमांक १ मधून बिनविरोध तर यंदा प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध निवडून आल्या.गटनेते कौतिक पगार हे मागील वेळेस प्रभाग क्रमांक ७ मधून तर यंदा प्रभाग क्रमांक १ मधून विक्रमी मताधिक्याने विजयी झाले.यामुळे पगार दाम्पत्याची नगरपंचायतीत दुसऱ्यांदा दिमाखदार एन्ट्री झाली आहे.
केंद्रीय मंत्र्यांना आमदारांकडून धक्का
राष्ट्रवादीसह आघाडीच्या ताब्यात असलेल्या कळवण नगरपंचायतीत ह्या वेळेस भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या माध्यमातून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला.मात्र राष्ट्रवादीने आमदार नितीन पवार,गटनेते कौतिक पगार यांच्या माध्यमातून हे आव्हान फोल ठरवत जनमताचा कौल मिळवला. केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या रोड शो आणि जाहीर सभे ऐवजी आमदार नितीन पवार यांच्या पायी प्रचाराला मतदारांनी कौल दिल्याची चर्चा निकालानंतर रंगली.
आमदार नितीन पवार, कौतिक पगार यांच्या मेहनतीला यश –
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळवणच्या सभेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपंचायतमध्ये संधी द्या असे आवाहन करतांना आमदार नितीन पवार व गटनेते कौतिक पगार यांना पुन्हा सत्ता घ्या, निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला होता. दोघांनी तो शब्द खरा करण्यासाठी प्रयत्न केले. पायी फिरुन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवारांनी मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार केला. आमदार नितीन पवार, कौतिक पगार यांनी जमिनीवर राहून प्रचार केला त्यांना कळवणकरांनी साथ दिली. मात्र रोड शो करुन मतदारांना टाटा करणाऱ्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना मतदारांनी मात्र टाटा करुन केवळ 2 जागा भाजपाच्या पदरात दिल्या.
….
विकासाला जनतेची साथ –
स्वर्गीय ए.टी.पवार यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिल्याने जनतेने त्यांना साथ दिली.कळवण शहरात कौतिक पगार यांनी विकासाला प्राधान्य दिल्याने मागील वेळेपेक्षा यंदा मतदारांनी जास्त उमेदवार निवडून देवून राष्ट्रवादी व आघाडीला साथ दिली.जनता धनशक्ती पेक्षा विकासासोबत असल्याचे ह्या निकालातून सिद्ध झाले.-
आमदार नितीन पवार,
कळवण – सुरगाणा मतदारसंघ
…..
जनतेचे प्रेम निर्विवाद –
कळवण शहरातील जनतेचे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्यावर प्रेम व विश्वास असून यंदा जनतेने विकासाला कौल देत आपल्यावर विश्वास दाखवला आहे.आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून शहराच्या चौफेर विकासासाठी कायम कटिबध्द असून जनतेचा मनापासून आभारी आहे –
कौतिक पगार, गटनेते,राष्ट्रवादी कॉंग्रेस

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यभरातील शाळा सोमवारपासून सुरू होणार? मुख्यमंत्री करणार घोषणा

Next Post

बोदवड नगरपंचायत : खडसेंना होम ग्राउंडवर धक्का, शिवसेनेने ९ जागांवर मिळवला विजय; भाजप एका जागेवर विजयी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Jayant Patil e1701442690969
संमिश्र वार्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यावर जयंत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया….

सप्टेंबर 14, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हायव्होल्टेज सामना रद्द होणार? पडद्यामागे हालचाली सुरु

सप्टेंबर 14, 2025
modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Next Post
khadse 1

बोदवड नगरपंचायत : खडसेंना होम ग्राउंडवर धक्का, शिवसेनेने ९ जागांवर मिळवला विजय; भाजप एका जागेवर विजयी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011