बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तुमच्याकडे कालनिर्णय कॅलेंडर आहे? मग, हा खुलासा एकदा वाचाच

by India Darpan
डिसेंबर 16, 2022 | 12:55 pm
in संमिश्र वार्ता
0
kalnirnay

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या अवमानावरून वादंग सुरू असल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारमधील मंडळीच हा अवमान करत असल्याने त्याविरोधात विरोधकांनी उद्या (दि. १७) महामोर्चाचं आयोजनदेखील केलं आहे. असं असतानाच आता कालनिर्णयच्या दिनदर्शिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा उल्लेख राहून गेल्याचे समोर आले आहे. मात्र, ही चूक लक्षात येताच कालनिर्णयने तात्काळ खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

कालनिर्णय २०२३च्या आवृत्तीमध्ये १६ जानेवारी रोजी असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचा उल्लेख करण्याचे राहून गेले आहे. या पुढील कालनिर्णयच्या उर्वरित सर्व प्रतींमध्ये तसेच या पुढील सर्व आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल, असे कालनिर्णयने त्यांच्या ट्विटर हँडलवरून खुलासा करताना म्हणले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला अतीव आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही मनापासून दिलगीर आहोत, असा खुलासा कालनिर्णयने केला आहे. तसेच कालनिर्णयने ही चूक पुन्हा न करण्याची हमीही दिली आहे. कालनिर्णयच्या या खुलाश्याला अनेकांनी लाईक्स केलं आहे. तसेच अनेक कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांनी काही सूचनाही केल्या आहेत.

अॅपमध्ये बदल करण्याचा सल्ला
छपाई झालेल्या कॅलेंडरमध्ये सुधारणा करता येणार नसली तरी प्ले स्टोअर अॅपमध्ये तुमचं कॅलेंडर आहे; कमीत कमी त्यात तुम्ही बदल करू शकता, असा सल्ला काहींनी दिला आहे. तर काहींनी कालनिर्णय घेणं बंद करत असल्याचं सांगत मोबाईलमधून अॅप डिलीट करत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींना ही जाणीवपूर्वक केलेली चूकदेखील वाटते आहे.

pic.twitter.com/AvKJcCZYMV

— Kalnirnay (@Kalnirnay) December 15, 2022

Kalnirnay Calender Clarification on Big Mistake

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रद्धा हत्याकांडाची दखल घेत शिंद-फडणवीस सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

अतिशय संतापजनक! बापाने मुलीला भर लग्नमंडपातून फरफटत घरी आणले… थेट फासावरच लटकवले… सरण रचून मृतदेहही जाळला..

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

अतिशय संतापजनक! बापाने मुलीला भर लग्नमंडपातून फरफटत घरी आणले... थेट फासावरच लटकवले... सरण रचून मृतदेहही जाळला..

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011