नाशिक – ज्येष्ठ पत्रकार गुरीश कुबेर यांच्यावर आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शाई फेकीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकाराच्या समर्थनार्थ आणि विरोधात जोरदार प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कुबेर यांच्यावर शाई फेकली आहे. मात्र, हे असे का करण्यात आले, याचे कारण संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.
गिरीश कुबेर यांनी रिनैसंस स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकातील मजकूरच वादाची किनार बनला आहे. यापूर्वीही त्यावर वाद झाला आहे. कुबेर यांनी या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी लिहीले आहे. कुबेर त्यात म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज यांनी सोयराबाईंची हत्या केली. तसेच, सोयराबाई यांच्याशी निष्ठा असणाऱ्या अनेकांनाही संभाजी महाराजांनी ठार केले होते. यातील काही जण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात होते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींची चांगली फळी तयार केली होती ती नष्ट झाली. परिणामी, छत्रपती संभाजी महाराजांना या कार्याची किंमत मोजावी लागली, असे कुबेर यांनी पुस्तकात नमूद केले आहे. या मजकुरावरुन जोरदार टीका करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही कुबेर यांचा आणि त्यांच्या लिखाणाचा निषेध केला आहे. शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण लिहिल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, छत्रपती संभाजीराजे यांनी याप्रकरणी पुस्तकाच्या प्रकाशकांना कडक भाषेत पत्रही लिहीले आहे.
https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1397051746799603712?s=20
कुबेर आणि वाद
गिरीश कुबेर यांच्या लिखाणामुळे अनेकदा वाद झाले आहेत. कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत. कुबेर यांनी लोकसत्तामध्ये एक अग्रलेख लिहीला होता. त्यालेखामुळे त्या समाजाची मोठी बदनामी झाली. यांसदर्भात जोरदार टीका आणि वाद झाला. अखेर कुबेर यांनी हा अग्रलेख मागे घेत असल्याचे प्रसिद्ध केले होते. नाशिकमध्ये होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण या विषयावर परिसंवाद होता. त्याचे अध्यक्षपद कुबेर यांच्याकडे होते. आयोजकांच्या या निवडीला यापूर्वीच संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शविला होता. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी त्यासंदर्भातील ट्विट केले होते.
https://twitter.com/esantoshshinde/status/1467379718278189057?s=20