इंडिया दर्पण – हास्य षटकार – हणम्या जेव्हा हॉटेलमध्ये जातो..
वेटर – साहेब, काय आणू
हणम्या – तुमच्याकडे काय हाय झक्कास
वेटर – साहेब, गरम हवे की थंड
हणम्या – गरम मध्ये काय हाय
वेटर – चहा, कॉफी की अन्य काही हवे
हणम्या – एक कापी केवढ्याला हाय
वेटर – साहेब, २० रुपयाला
हणम्या – एवढी महाग. आरं, शेजारच्या दुकानात
२ रुपयाला कापी हाय. आणि इथं २०.
एवढं लुटू नका रं
वेटर – साहेब, अहो ते झेरॉक्सचं
दुकान आहे.
– हसमुख