इंडिया दर्पण – हास्य षटकार – ठमा काकूंचा रेल्वे प्रवास आणि गाजराचा हलवा
(ठमा काकू आपल्या नातवाला घेऊन रेल्वे प्रवास करत असतात तेव्हा)
ठमा काकू – अरे बाळा, तुझ्यासाठी
किती गोडगोड गाजराचा हलवा
केला आहे. पटापट खा….
(नातू सतत तोंड फिरवतो)
ठमा काकू – अरे माझ्या बाळा,
पटकन हा हलवा खा
नाही तर
त्या शेजारच्या काकांना
देऊन टाकेन….
(खुप वेळ झाल्यानंतर)
शेजारच्या बाकावरील व्यक्ती (वैतागून) – अहो, बाई,
काय करायचं ते लवकर ठरवा.
तुमच्या हलव्याच्या आशेने
मी माझं स्टेशन सोडलंय
आणि दोन स्टेशन
पुढं आलोय..
– हसमुख