इंडिया दर्पण – हास्य षटकार – म्हणीचा अर्थ ऐकून शिक्षकांना चक्कर येते
(शाळेत शिक्षक शिकवित असतात)
दांडगे मास्तर – पोरांनो, आज मी तुम्हाला
एका म्हणीचा अर्थ
विचारणार आहे.
त्याचे उत्तर योग्य द्या
सर्व विद्यार्थी (ओरडून) – हो मास्तर.
दांडगे मास्तर – हं. तर सांगा मग,
“अंथरुण पाहून पाय पसरावेत”,
या म्हणीचा अर्थ
नक्की काय आहे?
गोट्या – मास्तर, मी सांगू का..
दांडगे मास्तर – हो हो सांग बरं
गोट्या – सोप्पं आहे.
अंथरुणाच्या बाहेर जर
पाय गेले तर
डास चावतील.
(हे ऐकून दांडगे मास्तरांना चक्कर आले)
– हसमुख