इंडिया दर्पण – हास्य षटकार – सुधीर जेव्हा मुलगी पहायला जातो…
सुधीरचे लग्न करायचे असल्याने
मुली बघण्याची धावपळ सुरू असते.
एक दिवशी सुधीर आपल्या कुटुंबियांसह मुलगी पहायला जातात.
सर्वजण बसतात. आणि मुलीला सर्वांसमोर बसवले जाते.
त्याचवेळी मुलीच्या घरची तिची सर्वांसमोर प्रशंसा करतात.
मुलीचे वडील : ‘पिंकीचा आवाज कोकिळेसारखा आहे!..
तिची मान मोरासारखी आहे..,
तिची चाल हरणासारखी आहे…
आणि स्वभावाने ती गाय…
सुधीर (चिंतेच्या स्वरात) : अरे बापरे. हिच्यामध्ये सर्व पशुचेच गुण आहेत का?
एकही मानवी गुण नाही का?
– हसमुख