इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संता आणि बंता
संता आणि बंता हे दोन्ही जिवलग मित्र असतात.
दोघे भेटतात त्यावेळी
संता : रात्री उशिरा घरी पोहोचलो,
बेल वाजवली पण बायकोने दार उघडले नाही!
बंता : मग, काय झालं
संता : रात्रभर रस्त्यावर काढावी लागली.
बंता : सकाळी बायकोचा समाचार घेतला की नाही?
संता : नाही मित्रा, सकाळी नशा उतरल्यावर आठवलं,
माझं अजून लग्न झालं नाहीये.
आणि घराची चावी खिशातच होती!
– हसमुख