इंडिया दर्पण – हास्य षटकार – राजू आणि जिलेबी विक्री
घरचे राजूला खुप बोलतात.
त्यामुळे तो जिलेबी विक्रीचा व्यवसाय सुरू करतो.
लोटगाडीवर तो जिलेबी विकत असतो.
जिलेबी विकताना राजू ओरडतो…
बटाटे घ्या, बटाटे
तेवढ्यात तिथे एक मूल येते
आणि ते म्हणते
ही तर जिलेबी आहे मग तुम्ही बटाटे का ओरडताय
राजू – अरे गप्प बस!
नाहीतर तुझे ऐकून माश्या येतील.
आणि जिलेबीवर बसतील.
– हसमुख