इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्राध्यापक, विद्यार्थी आणि प्रेम
भांगरे प्राध्यापक एकदा कॉलेजमध्ये शिकवित असतात.
समाजशास्त्रावर माहिती देत असतानाच
प्रेमाचा विषय निघतो. त्यामुळे सहाजिकच
प्राध्यापक बुवांना लहर येते प्रश्न विचारण्याची
भांगरे प्राध्यापक : आय लव्ह यू हा शब्द कोणत्या देशात जन्माला आला?
किंवा शोधला गेला माहित आहे का?
विद्यार्थी : सर, मी सांगू का
भांगरे प्राध्यापक : हो सांग ना
विद्यार्थी : चीन
भांगरे प्राध्यापक : एवढ्या आत्मविश्वासाने तू कसं काय सांगतो आहेस?
विद्यार्थी : कसं आहे सर..
प्रेमात सर्व चिनी गुण आहेत…
ना गॅरंटी असते…
ना वॉरंटी…
चाललं तर चंद्रापर्यंत जातं,
नाही तर मग संध्याकाळपर्यंत….
– हसमुख