इंडिया दर्पण – हास्य षटकार – पिंट्याचे उत्तर ऐकून जेव्हा शिक्षकांना चक्कर येते
(शाळेत खानझोडे मास्तर शिकवित असतात तेव्हा)
खानझोडे मास्तर – पिंट्या, सांग बरं
पूर्व दिशा
कुठे आहे ते….
पिंट्या – सर, मला नाही माहित.
मात्र, माझ्या आईला
नक्की माहित आहे की
पूर्व दिशा कुठे आहे….
खानझोडे मास्तर – अरे पिंट्या, सोप्पं आहे ते.
त्यासाठी आईला
विचारण्यासाठी
कशाला जायला हवं…
पिंट्या – मास्तर, कारण
बाबा नेहमी
आईला म्हणतात की,
तू म्हणशील ती पूर्व
(पिंट्याचे उत्तर ऐकून मास्तरांना चक्कर यायला लागतात)
– हसमुख