इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
न्यूटनचा नियम
शिक्षक शाळेमध्ये शिकवित असतात.
विषय असतो न्यूटनचा नियम
शिक्षक अतिशय सविस्तरपणे
आणि विद्यार्थ्यांना समजेल
अशा पद्धतीने समजावून सांगत असतात
शिक्षक – एखाद्या पेपरवर वजन ठेवले
तर तो आपल्या जागेवरुन
हलत नाही.
हा न्यूटनचा नियम आहे.
संगीता – पण सर, माझे बाबा
नेहमी म्हणतात की,
ऑफिसमधील पेपरवर
वजन ठेवल्यावर
ते तिथून लवकर हलतात…
– हसमुख