India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

India Darpan by India Darpan
January 28, 2023
in साहित्य व संस्कृती
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कादंबरीकार व जेष्ठ लेखिका आशा बगे यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार निवड समितीत डॉ. अनुपमा उजगरे,श्रीमती संध्या नरे-पवार, प्रफुल्ल शिलेदार, डॉ. सदानंद बोरसे यांचा समावेश होता. अविनाश सप्रे आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत. त्यांच्या भूमी या कादंबरीला २००६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री.पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला व नंतर मौज व बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.

आशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ ला २००७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला. आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्याहीमुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.

आशा बगे यांचे प्रकाशित साहित्य (संपादन)
· अनंत (कथासंग्रह)
· अनुवाद (माहितीपर)
· ऑर्गन (कथासंग्रह)
· आशा बगे यांच्या निवडक कथा (संपादित, संपादक – प्रभा गणोरकर)
· ऋतूवेगळे (कथासंग्रह)
· चक्रवर्ती (धार्मिक)
· चंदन (कथासंग्रह)
· जलसाघर (कथासंग्रह)
· त्रिदल (ललित)
· दर्पण (कथासंग्रह)
· धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (ललित कथा)
· निसटलेले (कथासंग्रह)

· पाऊलवाटेवरले गाव (कथासंग्रह)
· पिंपळपान भाग १, २, ३ (कथासंग्रह; सहलेखक – शं.ना. नवरे, हमीद दलवाई)
· पूजा (कथासंग्रह)
· प्रतिद्वंद्वी (कादंबरी)
· भूमिला आणि उत्सव (कथासंग्रह)
· भूमी (कादंबरी)
· मांडव
· मारवा (कथासंग्रह)
· मुद्रा (कादंबरी)
· वाटा आणि मुक्काम (अनुभव कथन; सहलेखक – भारत सासणे, मिलिंद बोकील, सानिया)
· वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग १, २ (संपादित)
· श्रावणसरी
· सेतू (कादंबरी)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]
· दर्पण या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार
· ‘भूमी’साठी २००६चा साहित्य अकादमी पुरस्कार
· २०१२चा मालतीबाई दांडेकर पुरस्कार
· २०१८ : राम शेवाळकर यांच्या नावाचा (पहिला) साहित्यव्रती पुरस्कार
· विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद


Previous Post

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - न्यूटनचा नियम

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group