इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
म्हणीचा खरा अर्थ
(शाळेच्या वर्गात खानझोडे मास्तर शिकवित असतात)
खानझोडे मास्तर – पोरांनो, आज आपण म्हणीचे अर्थ समजून घेणार आहोत
सर्व विद्यार्थी (जोरात आवाज करीत) – हो मास्तर
खानझोडे मास्तर – मला एका म्हणीचा सांगा अर्थ पाहू
गण्या आणि झंप्या – हो विचारा मास्तर
खानझोडे मास्तर – सापाच्या शेपटीवर पाय देणे, या म्हणीचा अर्थ काय आहे
गण्या – मी सांगू का मास्तर
खानझोडे मास्तर – हो हो सांग बरं
गण्या – सोप्पं आहे मास्तर, या म्हणीचा अर्थ आहे
बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे.
(हे ऐकून मास्तरांच्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले)
– हसमुख