इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती, पत्नी आणि भांडण
सोमवारचा दिवस असतो.
पती पटापट त्याचे सर्व काम आवरतो.
त्याला ऑफिसला जायचे असते.
तेवढ्यात किरकोळ कारणावरुन
पत्नीशी त्याचे भांडण होते.
पती : जर तुझ्याकडे कौशल्य असेल तर
त्या कौशल्याला कमाईचे साधन बनव…!
पत्नी : म्हणजे आता तुझ्याशी भांडल्यावर मी पैसे घ्यावेत का…!
– हसमुख
