इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जुना आणि नवा मोबाईल
मोनू सकाळी वर्तमानपत्र वाचत असतो.
त्यात त्याला एक जाहिरात दिसते.
“जुना मोबाईल द्या आणि नवा घ्या”!!
या ऑफरचा लाभ घेण्याचे मोनू निश्चित करतो.
जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर मोनू जातो.
पण तिथे त्याला ते दुकान दिसत नाही.
ते दुकान तो पुन्हा शोधायला लागतो.
तिथे उभ्या असलेल्या दोन तरुणांना तो जाहिरातीबद्दल विचारतो,
तत्काळ त्यातील एका तरुणाने बंदूक काढली
आणि म्हणाला – ती जाहिरात आम्हीच दिली होती,
चल पटकन जुना मोबाईल काढ आणि नवीन घेऊन टाक!!!
– हसमुख