नोकरी शोधण्यात तुम्हाला सहाय्य करतील ही शीर्ष ऑनलाईन जॉब पोर्टल्स
कोरोना साथीच्या रोगाला आता २ वर्ष होत आहेत आणि त्याच्या प्रसारामुळे संपूर्ण जगभरातील व्यवसायांवर अजूनही परिणाम होतच आहे. एका संशोधनानुसार, भारतातील सुमारे २ दशलक्ष पदवीधर आणि अर्धा दशलक्ष पदव्युत्तर तरुण सध्या बेरोजगार आहेत आणि योग्य नोकरीच्या शोधात आहेत, मग ती दूरस्थ असो अथवा ऑनसाइट संधी असो. लाखो पोस्टिंग्ज आणि कारकीर्द घडवण्यासाठीचे शिकवणी वर्ग, रिझ्युम कस्टमायझिंग आणि सहाय्य्यभुत कल्पनांनी परिपूर्ण ब्लॉग एंट्री, यासारख्या अतिरिक्त साधनांसोबतच, नोकरी संकेतस्थळाचा उपयोग करणे हा डझनभर संधी शोधण्याच्या आणि अर्ज पाठविण्याच्या सर्वोत्तम आणि प्रभावी मार्गांपैकी एक आहे.
वर्ष २०२२ मधील तुमची स्वप्नातील नोकरी शोधण्यात तुम्हाला मदत करण्याकरिता ५ सर्वोत्तम जॉब पोर्टल्सची यादी इथे दिलेली आहे:
शाईन.कॉम (Shine.com):
शाईन.कॉम ची स्थापना २००८ मध्ये, भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात झाली, जेव्हा नोकरीच्या शोधात असलेल्यांना नियोक्त्यांशी जोडणाऱ्या पारदर्शी आणि प्रभावी ऑनलाइन पोर्टलची आत्यंतिक गरज होती. परंतु जेव्हा अन्य जॉब पोर्टल्स या स्पष्ट आवश्यकतांमधील अंतर भरून काढण्यासाठी हिरीरीने पुढे सरसावले होत, तेव्हा शाईन.कॉमच्या संस्थापक संघाने बाजारपेठेतील प्रचलित आव्हानांचा आणि त्यांचे निराकरण करू शकणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या विविध मार्गांचा सखोल अभ्यास केला. या संशोधनाभिमुख, तंत्र-चलित पध्दतीचा खूप चांगला लाभ झाला आहे; हे पोर्टल आज ४.१ कोटी नोंदणीकृत नोकरी शोधणा-यांच्या मोठ्या समूहाला ३ लाखांहून अधिक नोकऱ्या प्रस्तावित करीत आहे आणि एसबीआय लाईफ इंश्युरन्स, डेलॉइट, इन्फोसिस, आयसीआयसीआय, अॅमेझॉन इत्यादी आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असलेले ८,०००+ नियोक्ते त्याच्या व्यासपीठाशी संलग्न आहेत.
इन्डीड:
इन्डीड ही भारतातील अग्रगण्य जॉब पोर्टलपैकी एक आहे. जिचा उपयोग जगभरातून नोकऱ्या शोधण्यासाठी केला जातो. इन्डीड, त्यांच्या कोरोनाव्हायरस वर्क टूल्सद्वारे, या साथीच्या रोगाच्या काळात देखील रोजगार प्रदान करण्यात आपली भूमिका बजावत आहे. इंडिया येस ऑनलाइन वर्क पोर्टलद्वारे तुम्ही लाखो नोकऱ्या पाहू शकता आणि तुमची व्यावसायिक कारकीर्द अद्यतन करू शकता.
जॉब्स फॉर हर:
एक असे व्यासपीठ जे महिलांना नोकरी, समुदाय, मार्गदर्शन, पुनर्रकौशल्य, प्रेरणा आणि नेटवर्किंग संधींशी जोडून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला गती देण्यास सक्षम करते. २०१५ मध्ये आरंभ करण्यात आलेले हे पोर्टल त्यांच्या व्यासपीठावरील २.२ दशलक्ष पेक्षा अधिक नोंदणीकृत नोकरी इच्छुकांना देशभरातील ७५००+ कंपन्यांशी जोडते. हे व्यासपीठ व्यावसायिक कारकिर्दी सुरू/पुन्हा सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यावसायिक मार्गदर्शनदेखील देऊ करते. या ब्रँडकडे ५०० पेक्षा जास्त पुन:कौशल्य भागीदार देखील आहेत, जे महिलांना कार्यबलामध्ये रुजू होण्यापूर्वी/पुन्हा रुजू होण्यापूर्वी त्यांच्या स्वतःच्या पुन:कौशल्य /कौशल्य विकास, यामध्ये सहाय्य्य करतात.
मॉन्स्टर:
भारतीय लोकांसह जगभरातील नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मॉन्स्टर ही एक सुप्रसिद्ध वेबसाइट आहे. यांचेकडे नोकरीच्या शोधात असलेले तरुण आणि भारतीय नियोक्ते यांचे सु-विकसित आणि विस्तारित नेटवर्क आहे. इथे नियोक्ते आणि भविष्यातील कर्मचारी दोघांसाठी पर्यायांची विस्तृत निवड उपलब्ध आहे. याची निर्मिती १९९९ मध्ये मॉन्स्टर बोर्ड आणि ऑनलाइन करिअर सेंटरच्या विलीनीकरणाद्वारे केली गेली. ही डच बहुराष्ट्रीय मानव संसाधन सल्लागार कंपनी, रँडस्टॅड होल्डिंग यांची उपकंपनी आहे आणि तिचे मुख्यालय वेस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे आहे.
नोकरी.कॉम (Naukri.com):
हे व्यासपीठ अनेक उत्पादने प्रस्तावित करते, जसे की रीझ्युम डेटाबेस अॅक्सेस, सूची आणि प्रतिसाद व्यवस्थापन साधने (रिस्पॉन्स मॅनेजमेंट टूल्स). ४,७५,००० पेक्षा अधिक नोकऱ्या कोणत्याही क्षणी थेट उपलब्ध आणि ६० दशलक्षाहून अधिक सीव्हीसह, नोकरी.कॉमने २०१७-२०१८ मध्ये ७६,००० कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा दिली. भारतात कंपनीची ४२ शहरांमध्ये ५६ कार्यालये कार्यरत आहेत आणि परदेशात दुबई, रियाध, अबू धाबी आणि बहरीन येथे देखील कंपनीची कार्यालये कार्यरत आहेत.