इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात एएआयने नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत सल्लागार पदासाठी एकूण १४ जागा भरण्यात येणार आहेत. महिन्याकाठी सत्तर हजार रुपये पगाराच्या या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एएआयने भरती २०२३ साठी अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती मोहिमेंतर्गत १४ सल्लागार पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी १६ एप्रिल २०२३ पर्यंत gmhrwr@aai.aero या ईमेल आयडीवर अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी आवश्यक पात्रता निकष, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि पगार यासारखी सर्व आवश्यक माहिती aai.aero च्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांची वयोमर्यादा ७० वर्षांपेक्षा जास्त नसावी. एएआय भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
येथे करा अर्ज
या नोकर भरती संदर्भातील अधिसूचना उपलब्ध असून अर्ज पाठविण्यासाठी https://www.aai.aero/ ही लिंक देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रतींसह भरलेला अर्ज gmhrwr@aai.aero यावर ईमेल करायचा आहे. तसेच, हार्ड कॉपी जनरल मॅनेजर (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र, एकात्मिक ऑपरेशन कार्यालय, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई- ४०००९९ येथे पाठवायची आहे.
Job Recruitment Vacancy 70 Thousand Payment Direct Interview