इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील कलाकार हे त्यांच्या भुमिकांमुळे प्रेक्षकांचे आदर्श असतात. या क्षेत्रात काम करताना प्रत्यक्ष जीवनात माणूस म्हणून ते कसे आहेत यावरही चाहते आणि प्रेक्षक लक्ष ठेवून असतात. एक उत्तम कलाकार आणि उत्तम माणूस असलेल्या कलाकाराला प्रेक्षक कायम प्रेम देतात. मात्र चुकल्यावर प्रेक्षक हक्काने त्यांची कानउघाडणी करतात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री तब्बू सोबत घडला आहे. त्यामुळे तिचे चाहते तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. तब्बूचा आगामी चित्रपट ‘भोला’ आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याचवेळी तब्बूवर प्रेक्षक भडकले आहेत. त्यामुळे तब्बूचा हा चित्रपटच आम्ही पाहणार नाही, अशी भूमिका प्रेक्षकांनी घेतली आहे. त्यामुळे आता ‘भोला’वर आता संकटाचे सावट आले आहे.
अभिनेत्री तब्बू ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. गेले अनेक दिवस ती तिच्या ‘भोला’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. तब्बू आणि अजय देवगण यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. नेमकं याच दरम्यान तब्बूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गेले काही दिवस तब्बू आणि अजय देवगण त्यांच्या ‘भोला’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतच त्यांनी या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या दरम्यान एका तरुणीचा अतिउत्साह तब्बूला काही पटला नाही. त्यामुळे ती काहीशी नाराज झालेली दिसली आणि तिने जी प्रतिक्रिया दिली त्यामुळे ती ट्रोल होत आहे.
तब्बू आणि अजय देवगण दिल्लीच्या पॅसिफिक मॉलमध्ये पोहोचले होते. यावेळी तब्बू आणि अजयने प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि नंतर काहींनी फोटो सेशनही केलं. दरम्यान, एका लहान मुलीने पहिल्यांदा अजयला मिठी मारून फोटो काढले. त्यानेही कोणतीही चिडचिड न करता मोठ्या प्रेमाने पोज दिली. त्यानंतर ती तब्बूकडे गेली. त्या मुलीला तब्बू बरोबर मिठी मारलेला फोटो काढायचा होता. पण तिने तसा प्रयत्न करताच तब्बू मागे झाली आणि तिचा हात पकडून तो बाजूला करायला सांगितला. त्यानंतर त्या मुलीने काही अंतर लांब राहून तब्बूबरोबर फोटो काढला.
मात्र, हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी तब्बूला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “अजय देवगणबरोबरही तिने मिठी मारून फोटो काढला. त्याने काही हरकत घेतली नाही. मग तू का अशी वागलीस?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तू खूप उद्धट वागलीस. पैसा आल्यावर लोक स्वतःला काय समजू लागतात काय माहित.” तर आणखी एक नेटकरी म्हणतो, “ती छोटी मुलगी आहे. उत्साहाच्या भरात तिला कळलं नाही. पण तू तिच्याशी असं वागायला नको होतंस.” तर बाकीच्या युझर्सने थेट तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याबाबत म्हटले आहे. त्यामुळे आता या व्हायरल व्हिडिओमुळे तब्बू खूप चर्चेत आली आहे.
नुकताच तब्बू आणि अजय देवगण यांची भूमिका असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. ‘भोला’ चित्रपटाकडून देखील त्यांना अपेक्षा आहेत. मात्र, तब्बूचे हे वागणे प्रेक्षकांना पटलेले नाही. आता हा पब्लिसिटी स्टंट आहे की आणखी काही, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
Bollywood Actress Tabbu troll in social media