मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक येथील अशोल बिडकॅानवर गंभीर आरोप केले आहे. यात त्यांनी टेंडर घेण्यावरुन टीका केली आहे.
आव्हाड यांनी सोशल मीडियावर त्याबाबत पोस्ट टाकली असून त्यात म्हटले आहे की, सध्या मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर एक जावई तयार झाला आहे. त्यातलाच एक म्हणजे माझ्याच नाशिकमधील ‘अशोका बिडकॅान’. कुठलंही टेंडर हवे असेल तर अशोका बिडकॅानने टाकायचे आणि अशोका बिडकॅाननेच ते उचलायचे; अगदी एकच टेंडर जे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) च्या मार्गदर्शक प्रणालीनुसार एक टेंडर असेल तर ते काम त्यांना देताच येत नाही. असे असूनही महाराष्ट्रात काही ठिकाणी अशोका बिडकॅानला कामे देण्यात आलेली आहेत. अशोका बिडकॅानबद्दलची अधिकची माहिती आम्ही पुढील आठवड्यात देऊ.
डोंगर खणताना तो थोडा – थोडा खोदायचा असतो. एकत्रच जर खोदायला गेलात तर अख्खा डोंगरच खाली येतो. तेव्हा या नवीन जावयाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याची अधिक माहिती आम्ही देऊ ! असे सांगत त्यांनी इशाराही दिला आहे.