बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

क्या बात है! दुखापतग्रस्त असूनही मिळविले सुवर्ण पदक; लालरिनुंगा जेरेमीने घडविला इतिहास

by India Darpan
जुलै 31, 2022 | 6:12 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
FY Tdc5XoAArCNZ

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय भारोत्तोलक लालरिनुंगा जेरेमीने बर्मिंगहॅम येथे आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, जेरेमी हा दुखापतग्रस्त असतानाही त्याने आज तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या 67 किलो गटात विक्रमी वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. स्नॅचमध्ये, जेरेमीने 140 किलो वजन उचलून नवीन राष्ट्रकुल खेळांचा विक्रम प्रस्थापित केला, तर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने 160 किलो वजन उचलले आणि एकूण 300 किलो वजन उचलून त्याच्या गटात नवीन राष्ट्रकुल खेळांचा विक्रम प्रस्थापित केला. वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे दुसरे सुवर्ण आणि एकूण पाचवे पदक आहे. लालरिनुंगा जेरेमीपूर्वी, संकेत सरगर (रौप्य), गुरुराज पुजारी (कांस्य), मीराबाई चानू (सुवर्ण) आणि बिंदयाराणी देवी (रौप्य) यांनी भारतासाठी पदके जिंकली होती.

जेरेमीबद्दल सांगायचे तर, स्नॅचमध्ये त्याने पहिल्या प्रयत्नात 136 किलो वजन उचलले, तर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 140 किलो वजन उचलले आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 67 किलो गटात नवा विक्रम प्रस्थापित केला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने 143 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. स्नॅचमध्ये तो दुसऱ्या क्रमांकाच्या नायजेरियनपेक्षा 10 किलोने पुढे होता.

Our Yuva Shakti is creating history! Congratulations to @raltejeremy, who has won a Gold in his very first CWG and has set a phenomenal CWG record as well. At a young age he’s brought immense pride and glory. Best wishes to him for his future endeavours. pic.twitter.com/dUGyItRLCJ

— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2022

क्लीन अँड जर्कमध्ये जेरेमीने पहिल्याच प्रयत्नात १५४ किलो वजन उचलले आणि यादरम्यान तो जखमीही झाला. पहिल्याच प्रयत्नात त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 294 किलो वजन उचलून नवा विक्रम प्रस्थापित केला. दुसऱ्या प्रयत्नात या भारतीय वेट लिफ्टरने दुखापतग्रस्त असतानाही 160 किलो वजन उचलून सर्वांना चकित केले. दुसऱ्या प्रयत्नानंतर जेरेमी गुडघे टेकला होता, पण वजन उचलल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या प्रयत्नानंतर त्याचे एकूण वजन 300 किलो झाले. दुखापत असूनही जेरेमीने जोखीम पत्करून तिसऱ्या प्रयत्नात 165 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तो अपयशी ठरला. यापूर्वी त्याच्या पायाला दुखापत झाली होती, मात्र तिसऱ्या प्रयत्नानंतर त्याच्या डाव्या हातालाही मार लागला होता.

Jeremy Lalrinnunga Win Gold Medal In Commonwealth Games 2022

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

९५ हजार ग्रंथसंपदा असलेले शासकीय विभागीय ग्रंथालय वाचकांसाठी राहणार खुले

India Darpan

Next Post
liberara e1659271852115

९५ हजार ग्रंथसंपदा असलेले शासकीय विभागीय ग्रंथालय वाचकांसाठी राहणार खुले

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011