नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहकार विभागामार्फत मे 2022 मध्ये शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा (J.D.C&A) आणि सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा (C.H.M) घेण्यात आल्या होत्या. त्या परिक्षांचा निकाल घोषित करण्यात आला आहे, असे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिष खरे यांनी कळविले आहे.
परीक्षार्थ्यांना वरील परीक्षांचे निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्वाचे दुवे मधील जी.डी.सी ॲन्ड ए मंडळ येथे लॉगइन पासवर्ड वापरून उपलब्ध होणार आहेत. फेरगुणमोजणी करण्यासाठी परीक्षार्थ्यांना 31 डिसेंबर 2022 पर्यंत याच संकेतस्थळावर अर्ज सादर करता येतील.
फेरगुणमोजणी करण्यासाठी परीक्षार्थी यांनी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी रूपये 75/- अधिक बँक चार्जेस याप्रमाणे 31 डिसेंबर 2022 (रात्री 10.30 वा.) पर्यंत चलनाने भरणे आवश्यक आहे. भरणा करण्यात आलेले चलन बँकेत 03 जानेवारी 2023 पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नसल्याचेही डॉ. सतिष खरे यांनी कळविले आहे.
JDCA CHM Exam Result Declared See this