नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये एमसीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी असलेल्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 31 वर्षीय हिमांशू रंजन हा मूळचा झारखंडचा रहिवासी आहे. तो जेएनयूच्या भाषा विभागात भाषा अभ्यासक्रम करत आहे. तो चार्टर्ड अकाऊंटंट देखील आहे. तो मुनिरका येथे भाड्याने घेतलेल्या घरात राहतो. पीडित विद्यार्थिनीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जेएनयूमध्ये ती एमसीएचे शिक्षण घेत आहे. कॅम्पसमधील हॉस्टेलमध्येच ती राहते. एका कंपनीतही ती इंटर्नशिप करत आहे. तिने ऑफिसचा एक फोटो इंस्टाग्राम स्टेटसवर टाकला होता. त्यामुळे हिमांशूशी तिच्याशी ओळख झाली.
हिमांशूने नोकरीच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. पीडितेने सांगितले की, हिमांशूने तिच्या फोटोवर मेसेज केला की तो देखील जेएनयूचा विद्यार्थी आहे. त्याने पीडितेला नोकरी लावून देण्याची विनंती केली. या बहाण्याने तो तिच्याशी गप्पा मारायला लागला. यानंतर आरोपीने मोबाईल क्रमांक घेऊन फोनवर बोलण्यास सुरुवात केली.
गेल्या १४ मे रोजी हिमांशूने पीडितेला जेएनयू आवारातील इंडिया कॉफी हाऊसजवळ बोलावले. तो काही वेळ नोकरी, अभ्यास वगैरेबद्दल बोलला आणि मग मैत्रीबद्दल बोलला. पीडितेने विरोध केल्यावर आरोपीने तिला इंडियन कॉफी हाऊसच्या मागे अंधारात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने पीडितेचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर पीडितेने कोणाच्या तरी मदतीने पोलिसांना माहिती दिली. आता हिमांशूने अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.