नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेश चाचणी परिक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रकिया सुरू झाली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश चाचणी परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज 31 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन दिंडोरी खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण बोऱ्हाडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जे विद्यार्थी, विद्यार्थींनी 2022-23 या शैक्षणिक सत्रात इयत्ता 5 वी मध्ये शिकत आहेत, ज्यांची जन्मतारीख 01 मे 20211 ते 30 एप्रिल 2013 च्या दरम्यान आहे व नियमित इयत्ता तिसरी व चौथी उत्तीण झाले आहेत, असे विद्यार्थी प्रवेश चाचणी परिक्षेसाठी अर्ज भरण्यास पात्र आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासंबधी संपूर्ण माहिती नवोदय विद्यालय समिती नवी दिल्ली यांच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर व तसेच जवाहर विद्यालय खेडगावच्या www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Nashik/en/home या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
प्रवेश चाचणी परीक्षा शनिवार 29 एप्रिल 2023 रोजी जिल्ह्यातील 33 परीक्षा केंद्रावर होणाार आहे. तसचे प्रवेश परीक्षा प्रक्रियासंबंधी अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया समन्वयक श्याम मदनकर 9923615319 व आर.के. पराडे 9820879710 यांच्याशी या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती क्षेत्रातील गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), सर्व शाळेतील मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव तालुका दिंडोरी चे मुख्याध्यापक लक्ष्मण बोऱ्हाडे यांनी कळविले आहे.
Javahar Navoday Vidyalay Admission Process