जन्माष्टमी विशेष
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
भगवान श्रीकृष्ण :
युद्धभूमीवर जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा
जगातला पहिला तत्वज्ञ!
कुरुक्षेत्रा विषयी प्रत्येक भारतीयांना आकर्षण आहे. हजारो वर्षापूर्वी येथे झालेले महायुद्ध आणि भगवान श्रीकृष्णाने रणांगणावर अर्जुनाला सांगितलेली गीता भारतातीलच नाही तर जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे आधुनिक काळातील नवीन कुरुक्षेत्र पहायला जगभरातील पर्यटक लाखोंच्या संख्येने येतील यात संशय नाही!’ भारताच्या प्राचीन स्थानांमध्ये कुरुक्षेत्राचा समावेश अग्रक्रमाने केला जातो.इ.सनापुर्वी सुमारे १५०० वर्षे आर्य भारतात आले तेव्हापासून कुरुक्षेत्र हे ठिकाण महाभारतातील अनेक पौराणिक कथांशी जोडले गेलेले आहे. हिंदू धर्मियांचे अतिशय पवित्र स्थान म्हणून महाभारत कालापासून कुरुक्षेत्र प्रसिद्ध आहे.
हिंदूंचा सर्वाधिक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध ग्रंथ म्हणजे भगवद्गीता.या भगवद्गीतेच्या पहिल्याच श्लोकांत कुरुक्षेत्राचा उल्लेख धर्मक्षेत्रे असा केलेला आहे. महाभारताचे महायुद्ध याच भूमीवर लढले गेले होते आणि हे महायुद्ध सुरु होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश इथल्याच ज्योतिसर नावाच्या ठिकाणी केला होता. इ.स. ६०६ ते ६४७ या काळात थानेसर नगराचा राजा हर्ष याची ही राजधानी होती.अनेक शतके अतिशय समृद्ध असलेले हे नगर इ.स. १०११ मध्ये महमूद गजनवी या धर्मांध लुटेर्याने हे नगर नष्ट केले.
आधुनिक कुरुक्षेत्र
ह्ल्लीचे कुरुक्षेत्र हरयाणाच्या उत्तर दिशेला आहे. कुरुक्षेत्राच्या आसपास अम्बाला, यमुनानगर,करनाल आणि कैथल हे जिल्हे आहेत. कुरुक्षेत्र देखील जिल्ह्याचे ठिकाण आहे. दिल्ली आणि अमृतसर या राष्ट्रीय राजमार्गावरच हे शहर असल्यामुळे विमान,रेल्वे किंवा बस द्वारे येथे सहज येता येते.
इतिहास
सुरुवातीला कुरुक्षेत्राला ब्रह्माची यज्ञवेदी म्हणत असत. पुढे याला समंत पंचक म्हणु लागले. परशुरामाने आपल्या पित्याच्या ह्त्तेचा प्रतिशोध घेण्यासाठी क्षत्रियांचा संहार केला त्यावेळी क्षत्रियांच्या रक्ताने ५ कुंड त्याने येथे भरले. पुढे पितरांच्या आशीर्वादाने त्यांचे पवित्र जलाशयात रूपांतर झाले असे म्हणतात. पुढे अनेक वर्षांनी ही भूमी कुरुक्षेत्र या नावाने ओलखली जावू लागली या भूमीला कुरुक्षेत्र हे नव संवरण पुत्र राजा कुरु याच्या नावावरून पडले. राजा कुरु याने सोन्याच्या नांगराने सात कोस भूमी नांगरली त्यामुळया क्षेत्राला कुरुक्षेत्र असे नव पडले.
ब्राह्मण काळात कुरुक्षेत्र वैदिक संस्कृतीचे प्रमुख केंद्र होते. येथे अनेक यज्ञ केले जात असत.त्यामुळया क्षेत्राला धर्म क्षेत्र असेही म्हणता असत.
पौराणिक महत्व
पौराणिक ग्रंथांत कुरुक्षेत्राचे अनेक ठिकाणी वर्णन केलेले आढळते. ॠग्वेदात आणि यजुर्वेदात येथील अनेक स्थानांचे वर्णन केलेले आहे. येथे असलेली सरस्वती नदी ही भारतातल्या प्रमुख ३ नद्यांमधली एक प्रमुख नदी मानली जाते. याशिवाय अनेक पुराने,स्मृती याच प्रमाणे महर्षि वेदव्यास रचित महाभारतात तर कुरुक्षेत्रा चे विस्तार पूर्वक वर्णन केलेले आहे. विशेष म्हणजे कुरुक्षेत्राची पौराणिक सीमा 48 कोस एवढी मानली गेली आहे यात कुरुक्षेत्रा शिवाय कैथल,करनाल,पानीपत आणि जींद ही क्षेत्रं समाविष्ट आहेत. कुरुक्षेत्र हे अतिशय पवित्र मानले जाते येथे राहणारा किंवा येथे येवून ज्याला मृत्य येतो त्याची जन्म मरणाच्या फेर्यातुन कायमची सुटका होते असे अनेक धार्मिक व पौराणिक ग्रंथात लिहीले आहे.
कुरुक्षेत्रातील प्रमुख तीर्थ स्थानं :
ब्रह्म सरोवर, संनिह्त सरोवर, शक्तिपीठ श्री भद्रकाली मंदिर, ज्योतिसर ( महाभारताचे युद्ध सुरु होण्यापूर्वी जेथे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला) , पिहिवा,श्री स्थानेश्वर महादेव मंदिर, पुण्डरी ही सर्व तीर्थे प्रसिद्ध आहेत.
कुरुक्षेत्राच्या पावन धरतीवर श्री स्थानेश्वर महादेव मंदिर आहे. महाभारत युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेउन या मंदिरांत आले. त्यांनी येथे भगवान शिवाची आराधना केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला असे म्हणतात.
या तिर्थाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे मंदिर आणि गुरुद्वारा एकमेकांना लागुन आहेत.हजारो देशी आणि विदेशी पर्यटक येथे नित्य दर्शनाला येतात.
कुरुक्षेत्रावरील सुप्रसिद्ध ज्योतिसर या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची विश्वरूप दर्शविणारी भव्य मुर्तीची स्थापना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते नुकतीच करण्यात आली आहे.
भगवान श्रीकृष्णाचे विराट रूप!
भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायांत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट रूप दाखविल्याचे सगळ्या जगाला माहित आहे. बी.आर.चोप्राच्या महाभारत या सुप्रसिद्ध मालिकेतही श्रीकृष्णाचे हे विराट स्वरूप पाहिले होते . भगवान श्रीकृष्णाचे तेच विराट स्वरूप आता कुरुक्षेत्रावर कायमस्वरूपी पहायला मिळणार आहे.
कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि जेथे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले विराट रूप दाखविले त्याच जागेवर गुरुवार दिनांक ३० जून रोजी भगवान श्रीकृष्णाच्या ४० फूट उंचीच्या विराट स्वरूपातील अष्टधातूच्या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले.
श्रीकृष्णाच्या विराट स्वरूपातील ४० फूट उंचीच्या या मुर्तीचा भगवान श्रीकृष्णाच्या जगातील सर्वांत उंच मूर्तीमध्ये समावेश करण्यात आला आहे. भगवान श्रीकृष्णाचे विराट स्वरूप नावाची ही भव्य मूर्ती कुरुक्षेत्र पासून १२ किमी अंतरावर असलेल्या ज्योतिसार धाम या सुप्रसिद्ध ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे.
भगवान श्रीकृष्णाची विश्वरूप स्वरूपातील ४० फूट उंचीची ही भव्य मूर्ती तयार करण्यासाठी हरयाणा सरकारने गुजरात मधील सरदार सरोवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टेचू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वांत उंच पुतळा तयार करणार्या डॉ. राम वानजी सुतार यांच्यावरच ही कामगिरी सोपविली.
श्रीकृष्णाचे विराट स्वरूपाचे दर्शन घडविणाऱ्या या मूर्तीत श्रीकृष्णासोबत श्रीगणेश, ब्रह्मदेव, शिवजी, श्री विष्णुचे नृसिंह रूप,हनुमान, भगवान परशुराम,अग्निदेव देखील आहेत.डोक्यावर फणा उभारून सावली देणारा शेषनागही आहे.
जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ज्योतिसार धामला नवे रूप देण्यात येत आहे. येथे सुमारे एक लाख स्क्वेअर फूट जागेवर विविध प्रकल्प आकर घेत आहेत.हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर दररोज १०,००० पेक्षा अधिक पर्यटक येथे येतील अशी अपेक्षा आहे. कुरुक्षेत्र विकास मंडळाने ज्योतिसार, ब्रह्मसरोवर,संहित सरोवर,नर्कतारी बाणगंगा, अभिमन्यू टेकडी यांच्या विकास कामांना अग्रक्रमाने प्राधान्य दिले आहे. महाभारतावर आधारित थीमपार्क देखील तयार करण्यात येत आहे.
कुरुक्षेत्रा विषयी प्रत्येक भारतीयांना आकर्षण आहे. हजारो वर्षापूर्वी येथे झालेले महायुद्ध आणि भगवान श्रीकृष्णाने रणांगणावर अर्जुनाला सांगितलेली गीता भारतातीलच नाही तर जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे आधुनिक काळातील नवीन कुरुक्षेत्र पहायला जगभरातील पर्यटक लाखोंच्या संख्येने येतील यात संशय नाही!’
Janmashtami Special Article Kurukshetra Philosopher Shrikrishna