शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गोंडगाव येथील खटला जलदगती न्यायालयात… पालकमंत्र्यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबाची घेतली भेट…

by India Darpan
ऑगस्ट 7, 2023 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
1140x570

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना ३० जुलै रोजी घडली होती. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याने घटनेची कबुलीही दिली आहे. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी, दि.५ ऑगस्ट रोजी बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता‌.

आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोंडगाव येथे पीडितेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक गावकरी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पीडितेच्या कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन करण्यात येईल. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन बांधिल आहे. आठ दिवसांच्या आत या घटनेत चार्जशीट दाखल करत हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल.

शासन या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबास लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभही देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

Jalgaon Rape Murder Case Guardian Minister Gulabrao Patil

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रिलायन्सने ३ वर्षात सरकारी तिजोरीत जमा केले इतके कोटी… एवढ्या नोकऱ्याही दिल्या…

Next Post

या आठवड्यात आणखी एक राजकीय भूकंप? तर्कवितर्कांना उधाण

Next Post
shinde fadanvis pawar1 e1710312448933

या आठवड्यात आणखी एक राजकीय भूकंप? तर्कवितर्कांना उधाण

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
IMG 20250516 WA0348

वसंत व्याख्यान माला….ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही…माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011