नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव निंबायतीचे भूमिपुत्र वीर जवान बाजीराव मिस्कर व त्यांचा चिरंजीव साई बाजीराव मिस्कर यांचे अपघाती निधन झाले आहे. शेतकरी कुटुंबातून पुढे येत बाजीराव मिस्कर हे लष्करात सामील झाले. लष्करात त्यांनी भारतमातेची अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांचे आज अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. या अपघातात त्यांचा मुलगा साई याचेही दुःखद निधन झाले. या दोघांच्या निधनाने मिस्कर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे की, मी व माझे कुटुंबीय मिस्कर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.