मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगांव जिल्ह्यातील नवीन उद्योगांची गरज पूर्ण करण्यासाठी कुसुंबा जवळ ७५० एकर जागेत नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी येत्या आठवड्यात जागेची पाहणी करून अहवाल सादर करतीलय तसेच एमआयडीसीचे स्वतंत्र विभागीय कार्यालय जळगांव येथे सुरू करण्यात येणार आहे. कामगार विमा योजनेच्या हॉस्पिटलसाठी आवश्यक ५ एकर जागा एक महिन्यात निश्चिआत केली जाईल, अशा विविध विकासाची मुहुर्तमेढ रोवणारे निर्णय गुरूवारी मुंबई येथील उद्योग विभागात संपन्न बैठकीत झाल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँण्ड अँग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या एक्सप्रेस टॉवर येथील कार्यालयात संपन्न बैठकीत उद्योगमंत्री ऑनलाईन सहभागी झाले.
आमदार सुरेश भोळे व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उद्योग विभागाचे अवर सचिव किरण जाधव, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगांवकर, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता एस.आर.तुपे, प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, जळगांव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आमदार सुरेश भोळे यांनी उद्योजकांचे प्रश्नत तातडीने निकाली निघावेत. त्यामध्ये दिरंगाई करण्यार्याश अधिकार्यांकवर कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी केली. औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र चेंबरच्या जळगांव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजिका संगीता पाटील, तसेच महेंद्र रायसोनी, नितिन इंगळे, किरण बच्छाव, अरविंद दहाड, दिलीप गांधी, किरण राने, सचिन चोरडीया, सुयोग जैन, रूपेश शिंदे, राजेंद्र चौधरी, महेंद्र सोनार, रमेश शिंदे, संजय जैन यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेऊन विविध प्रश्नं मांडले.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जळगांव शहरातील व्यापारी-उद्योजकांचे प्रश्नद मांडून याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली तसेच, चोपडा, भुसावळ, भडगांव येथील औद्योगिक वसाहतींच्या पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी केली. एमआयडीसी क्षेत्रातील फायर स्टेशन सुरू करण्याची केलेल्या मागणीलाही तयारी दर्शविण्यात आली. विमानसेवा, पायाभुत सुविधा, एपीएमसी कायदा, प्रोमोशनल टॅक्स यासंबंधीच्या मागण्या अध्यक्ष गांधी यांनी सादर केल्या.
दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी उद्योग मित्र समितीच्या बैठका नियमित घेतल्या जातील. कामगार विमा योजना हॉस्पिटलसाठी जागेचा प्रश्नम लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही दिली. व्यापार्यां्चे विविध विभागांशी संबंधित स्थानिक प्रश्ना लवकर निकाली निघण्यासाठी `‘उद्योग मित्र समिती`’ च्या धर्तीवर ‘व्यापार मित्र समिती’ नेमण्याची मागणी ललित गांधी यांनी केली त्यास मान्यता देण्यात आली. दुकानगाळ्यांच्या भाड्याचा प्रश्नी, दुहेरी कर आकारणी व अन्य धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय ही यावेळी झाला.
आमदार सुरेश भोळे यांनी जळगांवला नवीन मोठा उद्योग प्रकल्प येण्यासाठी उद्योग विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. जळगांव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजिका संगिता पाटील यांनी जळगांव जिल्ह्याचा अपेक्षित विकास झाला नाही. आता जळगांव जिल्हाला विशेष प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. दरम्यान या बैठकीतील चर्चा आणि कार्यवाहीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षेखाली पंधरा दिवसात पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला.
Jalgaon New MIDC Industrial Development Mumbai Meet