India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री दादा भुसेंकडून पाहणी

India Darpan by India Darpan
March 10, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चांदोरी येथील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी पालकमंत्री श्री. भुसे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याबाबत कृषी विभागाने खबरदारी घ्यावी. शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील बाळासाहेब हिंगोले, गणपत हिंगोले यांच्या द्राक्ष बागांची व बाळासाहेब घोरपडे यांच्या गव्हाच्या शेतीची पाहणी केली.

Guardian Minister Bhuse Unseasonal Rainfall Crop Loss Nashik


Previous Post

जळगावमध्ये ७५० एकरवर होणार नवी एमआयडीसी; मुंबईतील बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे २०व्या मजल्यावरुन पडल्याने निधन

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे २०व्या मजल्यावरुन पडल्याने निधन

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group